टायगर श्रॉफ आता हॅलो या भारतातील आघाडीच्या सोशल मीडिया सुविधेवर

Date:

  • टायगरच्या अकाउंटला एकाच दिवसात मिळाले 500K हून अधिक फॉलोइंग
  • चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी हॅलोवर येणाऱ्या शिल्पा शेट्टी व विजय देवराकोंडा या प्रसिद्ध सेलिब्रेटींमध्ये आता टायगरचाही समावेश

नवी दिल्ली: – प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ लाखो चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी नुकताच हॅलो या भारतातील आघाडीच्या सोशल मीडिया अॅपवर सहभागी झाला आहे. थरारत भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला लोकप्रिय अभिनेता व सोशल मीडिया युजर टायगर आता हॅलोवर आला असून तेथे तो त्याचा फिटनेस व नृत्य, त्याच्या चित्रपटातील व प्रत्यक्ष जीवनातील किस्से आणि त्याच्या उत्कृष्ट पोस्ट हॅलोवर 15 विविध भाषांमध्ये चाहत्यांसाठी उपलब्ध आहेत. हॅलोवर अकाउंट तयार केल्यावर एकाच दिवसात टायगरला 600K हून अधिक फॉलोइंग मिळाले आहे. चाहत्यांशी जोडले जाण्यासाठी आणि आपल्या प्रत्यक्ष जीवनातील व पडद्यावर किस्से सांगण्यासाठी हॅलोचा वापर करणाऱ्या प्रमुख सेलिब्रेटींमध्ये आता टायगरचा नव्याने समावेश झाला आहे.

या सुविधेशी जोडले गेल्याबद्दल आनंद व्यक्त करताना टायगर श्रॉफ यांनी सांगितले, हॅलोमध्ये सहभागी झाल्याचा मला अतिशय आनंद होत आहे आणि या सुविधेद्वारे चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी मी उत्सुक आहे. सर्व चाहत्यांपर्यंत पोहोचणे आणि ते जिथे असतील तिथे त्यांच्याशी जोडलेले राहणे, हा माझा प्रयत्न असणार आहे. हॅलोचे आभार, आता चाहत्यांसाठी त्यांच्या मातृभाषेमध्ये मला कण्टेण्ट निर्माण व शेअर करता येणार आहे”.

टायगर श्रॉफ सोशल मीडिया हँडल्सवर उत्तम पोस्ट शेअर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. विनम्रता हा टायगरचा सर्वांना माहीत असणारा स्वभावविशेष असून त्यामुळेच तो चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. टायगर सध्या सर्बिया येथे ‘बागी 3’ या आगामी अॅक्शन ड्रामाचे चित्रिकरण करतो आहे.

प्रादेशिक भाषा बोलणाऱ्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी भारतीय फिल्मजगतातील अनेक सेलिब्रेटी हॅलोमध्ये सहभागी झाले आहेत. हन्सिका मोटवानी ही हॅलोवर जाणारी पहिलीवहिली लोकप्रिय कलाकार ठरली. शिल्पा शेट्टी, विजय देवराकोंडा व अन्य अनेक सेलिब्रेटींनी हॅलोचा स्वीकार केला आहे आणि ते दररोज त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसतात.

हॅलोविषयी

हॅलो ही भारतातील आघाडीची प्रादेशिक सोशल मीडिया सुविधा आहे. तुमच्या स्वतःच्या भाषेत कण्टेण्ट निर्माण व शेअर करण्याची, जास्तीत जास्त लोकांशी जोडलेले राहण्याची सोय देणे, हे हॅलोचे उद्दिष्ट आहे. हॅलो हिंदी, तेलुगु, मल्याळम, तामिळ यासह 15 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

क्रांतीज्योती बाल संगोपन योजनेचा 8 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना लाभ

पुणे, दि. 22: माहे एप्रिल 2025 अखेर क्रांतीज्योती बाल...

YES BANK तर्फे नफ्यात सातत्यपूर्ण वाढ,तिमाहीत 1,068 कोटी रु.चा निव्वळ नफा

विकासाला गती, CASA मध्ये उत्कृष्ट कामगिरी, सुधारित मार्जिन्स आणि...

गोदरेज इंडस्ट्रीजचे २०३१ पर्यंत ५ लाख कोटींचे उद्दिष्ट

'१८९७ पासून निरंतर निर्मिती, प्रत्येक येणाऱ्या उद्याची' (Crafting tomorrow since 1897) हे कंपनीचे सामायिक ध्येय मुंबई, २२ एप्रिल, २०२६: गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपने आज आपले नवे ध्येय आणि नवी ब्रँड ओळख प्रस्तुत केली....