- मौल्यवान नाणी, दागिने, भांडी, झाडू, खातेवह्या आणि अशाच अजून खास खरेदीसाठी खास धनतेरस ई-स्टोअर
- सोन्याच्या नाण्यांच्या खरेदीवर विशेष सूट, चांदीची नाणी फक्त १४९ रुपयांपासून पुढे
- बँक कार्ड्स वापरून केलेल्या खरेदीवर २५% पर्यंतची अतिरिक्त सूट
नवी दिल्ली: भारतातील सर्वात मोठी ई-कॉमर्स बाजारपेठ म्हणून नावाजल्या जाणाऱ्या स्नॅपडीलने आपल्या ग्राहकांची दिवाळीची खरेदी सहजसोपी, आनंद आणि लाभ मिळवून देणारी व्हावी यासाठी खास धनतेरस ई-स्टोअर सुरु केले आहे. धनत्रयोदशी आणि संपूर्ण दिवाळीच्या सणासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू स्नॅपडीलच्या या खास धनतेरस ई-स्टोअरमध्ये एकाच ठिकाणी खरेदी करता येतील. भांडी, सोने व चांदीची नाणी, भांडी, जेम्सटोन्स, पूजेचे साहित्य, दिवाळीच्या साफसफाईसाठी झाडू आणि इतर वस्तू, घराच्या सजावटीच्या विविध गोष्टी अशी सगळी खरेदी या एकाच ठिकाणी करता येईल.
स्नॅपडील धनतेरस ई-स्टोअरमध्ये तुम्ही सोन्याच्या नाण्यांवर विशेष सूट मिळवू शकता. याठिकाणी चांदीची नाणी देखील अगदी सहज परवडण्याजोग्या किमतीत फक्त १४९ रुपयांपासून खरेदी करता येतील. सोन्या-चांदीची नाणी आणि बार एमएमटीसी पम्प, बंगलोर रिफायनरी, नॅशनल इंडिया बुलियन रिफायनरी (एनआयबीआर), गोल्डसिक्का ज्वेल्स आणि इतर ब्रॅंड्सचे आहेत. श्रीगणेश, श्री लक्ष्मी तसेच राधाकृष्ण यांच्या प्रतिमा असलेली नाणी देखील यामध्ये आहेत.
जेम्सटोन्सवर देखील कमीत कमी ५०% सूट दिली जात आहे. याशिवाय सोन्याचे आकर्षक कानातले, मंगळसूत्र, अंगठ्या, हार, नथनी, चेन्स, पेन्डन्ट्स आणि इतर अनेक दागिन्यांचे एकापेक्षा एक सरस प्रकार याठिकाणी उपलब्ध आहेत. आपल्या आवडीप्रमाणे १४, १८ किंवा २२ कॅरेटचे दागिने तुम्ही याठिकाणी खरेदी करू शकता.
उत्पादनांवर तर भरघोस सूट मिळत आहेच शिवाय जर तुम्ही बँक कार्डांचा वापर करून खरेदी करत असाल तर तुम्हाला अतिरिक्त सूट मिळविण्याची ही सुवर्णसंधी आहे. पीएनबी कार्ड्सवर २५%, रूपे कार्ड्सवर २०%, आरबीएल बँक कार्ड्स आणि फेडरल बँक डेबिट कार्ड्सवर १५% अशी आकर्षक सूट खरेदीसोबत लगेचच मिळेल.
स्नॅपडील प्रवक्त्याने याबद्दल अधिक माहिती देताना सांगितले, “या स्टोअरमधील सर्व वस्तूंच्या डिझाइन्समध्ये परंपरा आणि आधुनिकता यांचा सुरेख मेळ दिसून येतो. धनत्रयोदशीसाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तूंची खरेदी एकाच ठिकाणी, अगदी विनासायास करता यावी यादृष्टीने सर्व उत्पादने याठिकाणी उपलब्ध आहेत.”
गोदरेज आणि ओझोन या नामांकित ब्रँड्सच्या घरगुती वापराच्या तिजोऱ्यांच्या किमती २४९९ रुपयांपासून पुढे आहेत.
स्नॅपडीलवर धनत्रयोदशीच्या खरेदीमध्ये ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीच्या तांब्याच्या भांड्यांचे १२,००० पेक्षा जास्त पर्याय याठिकाणी आहेत. तसेच खातेवह्या, झाडू यासारख्या धनत्रयोदशीच्या खास वस्तू देखील याठिकाणी खरेदी करता येतील.
देवांच्या मूर्ती, यंत्रे, पूजेची सजविलेली ताटे, तसेच पूजेचे सर्व आवश्यक साहित्य अनेक विविध प्रकारांमध्ये याठिकाणी उपलब्ध आहे. दिवाळीच्या निमित्ताने घराची खास सजावट करण्याचे मनात असेल तर अगदी आयत्यावेळी देखील मनपसंद खरेदीसाठी स्नॅपडील धनतेरस ई-स्टोअरवर या. पडदे, उशांचे अभ्रे, टेबल मॅट्स आणि घर सजावटीच्या इतर अनेक वस्तूंची शानदार खरेदी करून अगदी कमी वेळात आणि कमी मेहनतीत तुम्ही तुमचे घर मस्त सजवू शकाल.
स्नॅपडील
ग्राहकांना सर्वाधिक मूल्य प्रदान केले जावे यावर भर देणारी स्नॅपडील ही भारतातील सर्वात मोठी ई-कॉमर्स बाजारपेठ आहे. दर महिन्याला तब्बल ७० मिलियनपेक्षा जास्त युजर्स स्नॅपडीलला भेट देतात आणि स्नॅपडीलवरील ५००,००० स्वतंत्र नोंदणीकृत विक्रेत्यांनी सादर केलेल्या २०० मिलियन वस्तूंमधून खरेदी करतात.