पुणे- सुप्रसिध्द ‘डॉक्युमेंटरी फिल्ममेकर’ स्व. प्रेम वैद्य यांच्या संग‘हातील दुर्मिळ छायाचित्रांचे ‘सिंग्युलर मुमेंटस इन हिस्टरी’ हे प्रदर्शन ६ ते १६ जून या कालावधीत भोसलेनगरमधील इंडियाआर्ट गॅलरीत भरविण्यात येणार आहे. ‘विसरू नये असे काही’ या वर्गातील ही छायाचित्रे स्वातंत्र्योत्तर काळातील आहेत.
ढाक्यातील शरणागती (१९७१ चे भारत-पाक युध्द आणि बांगलादेशची निर्मिती), लालबहादूर शास्त्री यांचे निधनापूर्वीचे ताश्कंदमधील शेवटचे छायाचित्र, जेआरडी टाटा यांचे विमान उड्डाण, टेल्कोमध्ये जेआरडी टाटा, गंगा नदीतील इंडो न्यूझीलंड जेट बोट, भारतीय पगडीतील सर एडमंड हिलरी, भारतीय लष्कराला चीनच्या लष्कराने दिलेली भेट, जयप्रकाश नारायण आदी दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार अभय वैद्य आणि इंडियाआर्टचे संचालक मिलिंद साठे यांनी या प्रदर्शनाचे संयोजन केले आहे. सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
स्वातंत्र्योत्तर काळातील दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन
Date: