पुणे- क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या वतीने आज येथे नगरसेवक अविनाश बागवे आणि सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या वारकऱ्यांसाठी महाप्रसाद आणि ईद मिलन या सयुंक्त कार्यक्रमाने सर्वधर्म समभावाचा संदेश दिला.
सहायक पोलीस आयुक्त प्रदीप आफळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी ,डॉ. मौलाना काझमी,नगरसेवक रफिक शेख,विठ्ठल थोरात ,रशीद खिजर,तसेच युवा नेते यासर बागवे ,इंदिरा बागवे आणि येथील मस्जिद चे ट्रस्टी ; हिंगोली ,परभणी, मुंबई आणि शिरवळ च्या दिंडीचे प्रमुख आणि वारकरी असे असंख्य मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते .
दरवर्षी संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकारामांच्या पालख्या पुण्यात विसावतात तेव्हा वारकरी आणि मुस्लीम बांधव यांच्या एकत्रित स्नेहसंमेलनाचे स्वरूप असलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते …पहा एक व्हिडीओ झलक ….
वारकऱ्यांसाठी महाप्रसाद आणि ईद मिलन सयुंक्त कार्यक्रमाने दिला सर्वधर्म समभावाचा संदेश
Date: