पुणे-क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठानचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने यंदा ची स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आली बॉडीबिल्डिंग अँड फिजिक्स असोसिएशन पुणे व पिंपरी-चिंचवड यांच्या मान्यतेने जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम भवानी पेठ या ठिकाणी जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी व माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते करण्यात आले.
या भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे श्री 2020 चा विजेता मल्लेश धनगर यांना पंचांच्या अंतिम निर्णयानुसार विजेता घोषित करण्यात आले ही स्पर्धा ७ वजन गटात आयोजित करण्यात आली होती. मानाच्या क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे 2020 या महत्त्वाच्या स्पर्धेकरिता पुणे शहर व जिल्ह्यातून नामांकित शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला होता मागील पंचवीस वर्षापासून प्रतिष्ठेच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे या स्पर्धेतील मुख्य विजेत्यास रमेश बागवे यांच्या हस्ते 11000 /- चषक, प्रशस्तीपत्रक, देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उपविजेता राजू भाडाळे व बेस्ट पोझर विनोद काकडे या शरीरसौष्ठवपटूंना गौरविण्यात आले. या स्पर्धेतील मोस्ट बॉडीबिल्डर हा किताब प्रदान करण्यात आला या सर्व स्पर्धकांना रोख पारितोषिक प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह गौरविण्यात आले
क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे श्री 2020 या अत्यंत महत्त्वाच्या पुणे शहरात दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धेकरिता व खेळाडूंना मार्गदर्शन प्रोत्साहन व गौरव करण्याकरिता पक्षाचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार ,मोहन जोशी, पुणे मनपाचे नगरसेवक लता राजगुरु, वनराज आंदेकर , विशाल धनवडे धनंजय जाधव संदीप लडकत, माजी महापौर रजनी त्रिभुवन RPI मातंग आघाडीचे अध्यक्ष हनुमंत साठे, मंजूर शेख, रशीद खिजर, पुणे बॉक्सिंग संघटनेचे सचिव मदन वाणी, राहुल डोंबाळे, विठ्ठल थोरात, विठ्ठल गायकवाड, सुजित यादव, परदेशी सतीश पवार, प्रवीण करपे, रमेश सोनकांबळे, व इतर सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ती प्रामुख्याने उपस्थित होते. ही स्पर्धा बॉडी बिल्डींग असोसिएशन पुणे व पिंपरी-चिंचवड बोडी अँड फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशन व त्यांच्या संघटने चे पंच या स्पर्धेस मुख्य संयोजक नगरसेवक अविनाश बागवे व व सर्व सहकाऱ्यांनी या स्पर्धेतील विशेष परिश्रम घेऊन ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली.