पुणे-शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिरात सकाळी सव्वाआठ वाजता पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक माजी उपमहापौर, नगरसेवक आबा बागुल व सौ.जयश्री बागुल यांनी विधिवत घटस्थापना केली. या प्रसंगी श्री दंडवते गुरुजी यांनी पौरोहित्य केले. शिवदर्शन येथील या दाक्षिणात्य पद्धतीच्या मंदिराचे नवरात्रौ निमित्त सुशोभीकरण करण्यात आले असून संपूर्ण मंदिराला नवीन रंग देण्यात आला आहे. तसेच संपूर्ण मंदिर झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजविण्यात आले असून आकर्षक रांगोळ्या व विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. विविध भजनी मंडळांची भजने तिथे होत आहेत.
श्रीलक्ष्मी मातेची संगमरवरी मूर्ती असून सोन्याचा मुकुट व दागिन्यांनी देवीला सजविण्यात आले आहे. आज घटस्थापनेच्या दिवशी दर्शनासाठी हजारो स्री-पुरुष भाविकांनी मंदिरासमोर रांगा लावल्या होत्या.