पुणे- तुम्ही तब्बल ५ वेळा निवडून दिले … निवडून दिल्यावर तुमच्या विश्वासाची जबाबदारी सदैव हृदयात बाळगून काम केले. कधीही डोक्यात हवा जाऊ दिली नाही , माझे आचरण असेच ठेवून कामाचा वेग दिवसेंदिवस उंचावेल कसा .. तुमच्या सुखसोयी ना पाठबळ मिळेल अशा कोणत्या योजना राबविता येतील याचा ध्यास ठेवेन आणि अशीच वाटचाल पुढे कायम ठेवील … तुमचे प्रेम असेच कायम राहू द्यात .. असे आवाहन आपल्या बालेकिल्ल्यात ..शिवदर्शन मध्ये कॉंग्रेसचे माजी उपमहापौर ,माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाग ३५ मधील कॉंग्रेसचे उमेदवार आबा बागुल यांनी केले .
आबा बागुलांची क्रेझ जशी वृद्धांमध्ये ,तरुणाई मध्ये तशीच ती लहान बालगोपाळांमध्ये हि आहे .जीवन आनंदाने जगावे हा मंत्र कायम देत आल्याने आनंद यात्री म्हणूनही आबा कडे अनेकजण पाहतात. यावेळी अनेक मुलांनी आबाशी हस्तांदोलनासाठी गर्दी केली होती .