पुणे -15 मार्च नंतर राज्य शासनाने पुणे मनपा क्षेत्रातील महानगर पालिकेचे कामकाज करण्याकरता महापालिका आयुक्तांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. त्या अनुषंगाने पुणे मनपा हद्दीतील विविध समस्यांबाबत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. पुणेकर नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्याकारिता टोल फ्री हेल्पलाईन उपलब्ध आहे परंतु त्याची कडक अंमलबजावणी होत नसलयाने समस्यांचे निवारण होत नाही. अधिकारी व कर्मचारी यांचे मोबाईल नंबर उपलब्ध करून देण्यात यावे तसेच शहरी गरीब योजना अंतर्गत खाजगी रुग्णांना मनपाने पैसे अदा न केल्याने अनेक गरजवंत रुग्णांना उपचार देण्यास खाजगी रुग्णालय टाळाटाळ करत आहेत व त्या खाजगी रूग्णालयाचे बिल अदा करण्यात यावेत. तसेच अधिकृत पथारी व्यवसायिक यांच्यावर देखील अतिक्रमण कारवाई होत असल्याने ते देखील निदर्शनास आणून देण्यात आले. त्याचप्रमाणे समाज कल्याणच्या अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचा लाभ 31 मार्चपूर्वी लाभार्थ्यांना देण्यात यावा.
11 एप्रिल महात्मा फुले जयंती व 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने मंडप उभारून नागरिकांना सुविधा देण्यात याव्या अश्या पुणे शहरातील विविध विषयावर आयुक्तांची भेट घेण्यात आली. याप्रसंगी उपस्थित शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, उपमहापौर सुनिता वाडेकर, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, मंदार जोशी, अशोक शिरोळे, संगीता आठवले, बसवराज गायकवाड, शशिकला वाघमारे, निलेश आल्हाट, श्याम सदाफुले, वसंत बनसोडे व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.