२७ सप्टेंबरला रंगकर्मींचे ‘पितृस्मृती आंदोलन’

Date:

रंगकर्मींच्या मागण्यांसाठी ९ ऑगस्ट २०२१ क्रांतीदिनी अख्ख्या महाराष्ट्रात आम्ही ‘जागर रंगकर्मींचा’ हे आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत सांस्कृतिक मंत्री महोदयांनी आम्हाला भेटीला बोलावले व आमच्या मागण्यांना तत्वत: मान्यता दिली पण अद्याप त्या संबंधीचा लेखी, सरकारी अध्यादेश (G.R) काढलेला नाही.

महाराष्ट्रातील रंगकर्मींनी ३० ऑगस्ट २०२१ रोजी नाट्यगृह आणि चित्रपटगृह सरकारने सुरु करावी यासाठी नटराजाची महाआरती आयोजित केली होती. त्याची दखल घेऊन ‘नाट्यगृह ५ नोव्हेंबर पासून चालू होतील’ अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली पण मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय रंगकर्मींना मान्य नाही.

‘राज्याचं सांस्कृतिक खातं आम्हां रंगकर्मींसाठी काहीही करीत नाही’, अशी ठाम समजूत महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींची झाली आहे आणि यामुळे रंगकर्मींची बाजू सरकारकडे न मांडणारं, रंगकर्मींच्या कामी न येणारं सांस्कृतिक खाते तात्काळ बंद करावे ही मागणी जोर धरु लागली आहे. या सरकारमध्ये आपला कुणीही वाली नाही असा विचार जोर धरु लागला आहे. लोकरंजनातून समाजाचे प्रबोधन करणार्‍या कलावंताना आणि कलाप्रकारांना पूर्वीपासून लोकाश्रय आणि राजाश्रय मिळाला. मात्र सध्या हा राजाश्रय दुरापास्त झाला असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

ज्ञात-अज्ञात अशा सर्व पितरांच्या ऋणांचे स्मरण पितृपंधरावड्यात केले जाते. त्यांच्यामुळे आपण आहोत, याची जाणीव ठेऊन हे स्मरण केले जाते. कलेची जोपासना करणार्‍या रंगकर्मींना कलेचा ठेवा आपल्या पूर्वजांकडून मिळाला आहे. असंख्य प्रतिभावान कलावंतानी त्यांच्या कलांनी आपली संस्कृती जपली, वाढवली. आजची परिस्थिती पाहून जे कलावंत आज हयात नाहीत त्यांनाही नक्कीच वेदना झाल्या असतील. त्यांच्या स्मृती जागवत कलेचा जागर पुन्हा सर्वत्र व्हावा यासाठी पितृपक्ष पंधरवड्यातील सोमवार २७ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्रातील रंगकर्मींनी आपापल्या जिल्ह्यात रंगकर्मी आंदोलनाचा भाग म्हणून ‘पितृस्मृती’ श्राद्धविधीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. मुंबईतील रंगकर्मी २७ सप्टेंबरला सकाळी ११.०० वाजता दादर, शिवाजी पार्क येथे जमून पितृपक्ष श्राद्ध आणि पिंडदान विधी करणार आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कॅलिफोर्नियाला ५.० तीव्रतेच्या भूकंपाचा हादरा; लॉस एंजेलिस विमानतळावरील विमानसेवा विस्कळीत!

४५ मिनिटांत भूकंपाचे अनेक उत्तरधक्के; विमानतळाच्या टर्मिनलचे नुकसान, त्सुनामीचा...

अर्जेंटिनाच्या ‘द रिव्हर ट्रेन’ला इफ्फीत रजत मयूर पुरस्कार; नावीन्यपूर्ण कथाकथनाचा आंतरराष्ट्रीय गौरव!

५७व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष परीक्षक पुरस्कार; २०...

‘कांतारा’चा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका; ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा रजत मयूर पुरस्कार!

५७व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनयाचा गौरव; सन्मानचिन्हासह १५...

पुणे पोलिसांचे पुन्हा ‘ऑल आउट ऑपरेशन’; २५ अवैध शस्त्रे जप्त, फरार आणि तडीपार आरोपींना बेड्या!

शहरातील ६५ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन; ६६० जेलमधून सुटलेल्या आरोपींची...