लॉक डाउनमध्येही सरकारी वसूली आणि शाळांच्या फीसच्या मागणीने लोक त्रस्त

Date:

भाजपा अध्यक्ष लोढ़ा ह्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मुंबई. कोरोना संकटात लॉक डाउन सुरू असतानाही आंतरराष्ट्रीय शाळांद्वारे मागण्यात येणारी फीस व सरकारी‌ यंत्रणांच्याद्वारे सुरू असलेले विविध करांची वसुली तत्काळ थांबवावी, अशी मागणी मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढ़ा ह्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे एका पत्राद्वारे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये भाजपा अध्यक्ष लोढ़ा ह्यांनी सरकारला म्हंटले आहे की, मुंबईमध्ये काही आंतरराष्ट्रीय शाळा आपल्या विद्यार्थ्यांची फीस भरण्यासंदर्भात नातेवाईकांना सांगत आहे. लोक सध्या तर घरी बसून आहेत आणि बाहेर सर्व काही व शाळासुद्धा बंद आहेत. तरीही शाळा ऑनलाईन ट्रान्सफर करण्यासाठी दबाव आणत आहेत व त्यामुळे पालक अतिशय तणावात आहेत. ह्याच प्रकारे महानगरपालिका व काही अन्य सरकारी विभाग लॉक डाउनच्या स्थितीतही लोकांकडून वेगवेगळे कर इ. वसुलीची सक्ती करत आहेत व त्यांना नोटीसही पाठवत आहेत. लोढ़ा ह्यांनी सरकारला लिहिले आहे की, आंतरराष्ट्रीय संकटाच्या ह्या काळात भारतीय रिजर्व बँक व अन्य बँका तसेच आर्थिक संस्थांच्या वसुलीला तीन महिने पुढे ढकलण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्याच धर्तीवर सार्वजनिक हिताशी संबंधित ह्या दोन महत्त्वपूर्ण विषयांसंदर्भात राज्य सरकारने नोंद घ्यावी व फीस वसूली तसेच सरकारी कराच्या मागणीला थांबवण्याचा आदेश जारी करावा. त्यांनी म्हंटले की, जनता कोरोनासारख्या महामारीच्या संकटाला सामोरे जाताना आधीच अडचणीत आहे आणि त्यात सरकारी यंत्रणा व शाळा नोटीस पाठवून जनतेला त्रस्त करत आहेत.

कोरोना संकटात अडकलेल्या लोकांना मदत करण्याच्या ह्या मागणीबरोबरच भाजपा मुंबई शहर अध्यक्ष लोढ़ा ह्यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवादसुद्धा दिले आहेत. त्यांनी लिहिले आहे की, कोरोना व्हायरसच्या विरोधात मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात ते व राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत जागरूकता ठेवून महत्त्वाचे व प्रभावी असे काम करत आहेत. अशा भीषण आपत्तीच्या काळात आंतरराष्ट्रीय शाळांच्या फीस वसुलीला अटकाव करावा व सरकारी विभागांची वसुली थांबवण्यासंदर्भात जनतेच्या हिताच्या दृष्टीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा व जनतेला दिलासा द्यावा, अशी आग्रहाची विनंती त्यांनी सरकारकडे केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धुळे येथील योग राज्यस्तरीय स्पर्धेत ‘मानसी’च्या १६ मुलींची दमदार कामगिरी

ना. चंद्रकातंदादा पाटील यांच्यावतीने सर्व मुलींचे विशेष कौतुक पुणे :...

अमित शहा साहेब, आलाच आहात पुण्यात तर.. शहरातील टेकड्यांची अवस्था आणि वाहतुकीची समस्याही प्रत्यक्ष पाहून जा!

पुण्याच्या वाढत्या प्रदूषणामागची कारणेही जाणून घ्या; वृक्षवल्ली आम्हा सोयरी...

परदेशात भारताची बदनामी करून सत्ता मिळणार नाही; राहुल गांधींना अमित शहांचा पुण्यातून टोला!

‘परदेश दौरे बंद करा, देशातील गावागावांत फिरा’; काँग्रेस आणखी...

पुण्यातून अमित शहांच्या हस्ते एनएचईसी प्रकल्पाचे भूमिपूजन, ‘भारत टॅक्सी’चा शुभारंभ!

तळेगावातील ११० एकरवरील बंद पडलेल्या औद्योगिक प्रकल्पाचे पुनरुज्जीवन; डिसेंबर...