लोक जनशक्ती पार्टी तर्फे शिवाजी महाराजांना अभिवादन

Date:

पुणे: रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लोक जनशक्ती पार्टी पुणे जिल्हा यांच्या वतीने पक्ष कार्यालय ,साधु वासवानी चौक, पुणे  या ठिकाणी साजरी करण्यात आली.
 यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट व प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे( अण्णासाहेब) यांच्या वतीने पुष्पमाला अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी पुणे जिल्हा व शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये उपाध्यक्ष राहुल उभे, दिपक भडके ,राहुल शेळके, राहुल कुलकर्णी, अप्पासाहेब भोसले, दामुआण्ण चौधरी, प्रमोद राजगुरू, अमित दरेकर, अविनाश बर्दापुरे, रझिया खान, सविता रणदिवे वैशाली वाघमारे इत्यादी प्रमुख उपस्थित होते.
या प्रसंगी छत्रपती शिवाजी महारांज्याच्यावर गौरवात्मक भाषणे झाली. यावेळी प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे यांनी शिवरायांचा गौरव करताना सांगितले की या देशामधील शिव छत्रपती हे धर्मनिरपेक्ष राज्य करणारे राजे होते. त्याचबरोबर शेतक-यांच्या ज्वारी,बाजरीच्या कणसालाही कोणी हात लावणार नाही. त्याच प्रमाणे स्त्रिंयाकडे कोणीही वाईट नजरेणे पाहणार नाही. सर्व बारा बलुते स्वराज्यामध्ये सुखाने, आनंदाने राहतील ,अशी व्यवस्था शिवछत्रपतींनी निर्माण केली होती. तशीच राज्यपद्धतीची व संस्काराची या राज्यास गरज आहे.   जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट म्हणाले, ‘ राजे शिवछत्रपतींना अभिप्रेत असलेले समतेवर आधारलेले राज्य निर्माण करण्यासाठी व तशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी लोक जनशक्ती पार्टी कटिबद्ध आहे.
राष्ट्रीय नेते  रामविलास पासवान व राष्ट्रीय खा. चिराग पासवान यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये लोक जनशक्ती पार्टी सामाजिक समतेचे बीजारोपन करत आहे. हा प्रयत्न शेवट पर्यंत फुले शाहु आंबेडकर विचारांचा पाईक म्हणून करत राहू, असेही ते म्हणाले.राहुल उभे यांनी आभार मानले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसदीय कारकिर्दीच्या शताब्दीनिमित्त पुणे महापालिका राबवणार विशेष उपक्रम

व्याख्यानमाला, परिसंवाद, प्रदर्शनांसह वर्षभर विविध कार्यक्रम; एक कोटी रुपयांच्या...

महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यभरात विविध उपक्रम

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची माहिती​​मुंबई दि.०६ :- सत्यशोधक...

पुण्यात २०१७ पासून किती झाडे तोडली आणि किती जगली? संपूर्ण हिशेब द्या! — मनसेचे साईनाथ बाबर

वृक्षतोड, पुनर्रोपण आणि भरपाई वृक्षलागवडीचे स्वतंत्र लेखापरीक्षण करा; कंत्राटदारांवरील...