सीबीआरने लाँच केला पोस्टाचा खास स्टँप

Date:

–          भारत सरकारच्या पोस्टल विभागातर्फे हा स्मरणार्थ स्टँप देशभरात उपलब्ध केला जाणार

–          देशातील आघाडीचे स्थान राखत सीबीआरईचा 20 टक्क्यांपेक्षा जास्त सीएजीआरने विकास

मुंबई– जगातील आघाडीची रियल इस्टेट कन्सल्टिंग कंपनी असलेल्या सीबीआरई साउथ एशिया प्रा. लि. कंपनीने आज भारत सरकारच्या पोस्ट विभागाबरोबर आपला खास पोस्टेज स्टँम्प लाँच केला. भारतीय बाजारपेठेतील कामकाजाची 25 वर्ष तसेच बाजारपेठेतील आघाडीचे स्थान साजरे करण्यासाठी हा स्टँप लाँच करण्यात आला.

 या स्टँपचे अनावरण सीबीआरई ग्रुप इंकचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रॉबर्ट ई सुलेन्टिक आणि श्री. अंशुमन मॅगझिन, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, भारत, दक्षिण आफ्रिका, पूर्व आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिका यांच्या हस्ते करण्यात आले.

कंपनीची एकूण कर्मचारी संख्या 10 हजार असून सीबीआरई भारत 20 टक्क्यांपेक्षा जास्त सीएजीआरसह विकसित होत आहे. कंपनीने देशाच्या प्रत्येक प्रदेशात आपला विस्तार केला आहे. मध्यम तसेच वरिष्ठ नेतृत्व गटातील अतिशय कमी अट्रिशनसाठी असलेल्या या कंपनीने भारत तसेच जगभरात निर्विवाद स्थान प्रस्थापित केले आहे. सीबीआरई राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या बहुतेक सर्व विभागांमध्ये कार्यरत असून आपल्या प्रभावशाली आणि दमदार ग्राहकवर्गासह कंपनीने जागतिक प्रतिष्ठा मिळवली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसदीय कारकिर्दीच्या शताब्दीनिमित्त पुणे महापालिका राबवणार विशेष उपक्रम

व्याख्यानमाला, परिसंवाद, प्रदर्शनांसह वर्षभर विविध कार्यक्रम; एक कोटी रुपयांच्या...

महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यभरात विविध उपक्रम

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची माहिती​​मुंबई दि.०६ :- सत्यशोधक...

पुण्यात २०१७ पासून किती झाडे तोडली आणि किती जगली? संपूर्ण हिशेब द्या! — मनसेचे साईनाथ बाबर

वृक्षतोड, पुनर्रोपण आणि भरपाई वृक्षलागवडीचे स्वतंत्र लेखापरीक्षण करा; कंत्राटदारांवरील...