पुणे पोलिसांचे पुन्हा ‘ऑल आउट ऑपरेशन’; २५ अवैध शस्त्रे जप्त, फरार आणि तडीपार आरोपींना बेड्या!

Date:

शहरातील ६५ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन; ६६० जेलमधून सुटलेल्या आरोपींची तपासणी, अवैध शस्त्रांप्रकरणी २३ गुन्हे दाखल

पुणे : शहरातील गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी पुन्हा एकदा विशेष ‘ऑल आउट ऑपरेशन’ राबविले. शुक्रवार आणि शनिवार (दि. २७ व २८ नोव्हेंबर) दरम्यान पोलिसांच्या सातही परिमंडळांसह गुन्हे शाखेने संयुक्तपणे राबविलेल्या या मोहिमेत २५ अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली. अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी २३ गुन्हे दाखल करून १६ आरोपींना अटक करण्यात आली.

शिवाजीनगर न्यायालय परिसरातील जीवघेण्या हल्ल्यानंतर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा चर्चेत असतानाच पुणे पोलिसांनी गुन्हेगारीविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे.

शहरभर नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन

  • ६५ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन.
  • ७९ संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी पायी गस्त.
  • १,४६२ वाहनांची तपासणी; ७९ वाहनचालकांवर कारवाई.
  • ३५८ हॉटेल्स, लॉज आणि मुसाफिरखान्यांची तपासणी.
  • १७२ संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणांची तपासणी.

गंभीर गुन्ह्यांतील आरोपींची झाडाझडती

  • कारागृहातून सुटलेले आरोपी – ६६०
  • खुनाच्या गुन्ह्यांतील आरोपी – १८३
  • खुनाच्या प्रयत्नातील आरोपी – ३१७
  • मोक्का अंतर्गत गुन्ह्यांतील आरोपी – २१३
  • शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्ह्यांतील आरोपी – ४४१
  • पॉक्सो अंतर्गत गुन्ह्यांतील आरोपी – १०६
  • जबरी चोरी, चेन आणि मोबाईल स्नॅचिंगमधील आरोपी – १०६

अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांतील अभिलेखावरील आरोपींचीही तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७० आरोपी मिळून आले.

फरार आणि तडीपार आरोपींना बेड्या

विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवे असलेले दोन आरोपी आणि मोक्का प्रकरणातील एक आरोपी अशा एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली. तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आठ आरोपींनाही पोलिसांनी अटक केली. तसेच चार अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करण्यात आली.

अवैध शस्त्रे आणि ड्रग्जविरोधात कठोर कारवाई

अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी २३ गुन्हे दाखल करून १६ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २५ अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली. शस्त्रविक्री करणाऱ्या २२ आस्थापनांचीही तपासणी करण्यात आली.

अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी सात गुन्हे दाखल करून आठ आरोपींना अटक करण्यात आली.

अवैध धंद्यांवरही पोलिसांचा बडगा

दारूबंदी आणि जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत सहा कारवाया करण्यात आल्या. याशिवाय एका अवैध धंद्यावर छापा टाकून एका आरोपीला अटक करण्यात आली. अनधिकृत फेरीवाल्यांवर सहा कारवाया करण्यात आल्या असून, महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार प्रतिबंधात्मक तसेच अन्य कारवायाही करण्यात आल्या आहेत.

संशयास्पद हालचाली दिसल्यास ११२ वर संपर्क साधा

गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष मोहिमा राबविण्यात येत आहेत. नागरिकांना कोणतीही संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाल आढळल्यास जवळच्या पोलिस ठाण्याशी किंवा पोलिस नियंत्रण कक्षाच्या ११२ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे शहर पोलिसांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अर्जेंटिनाच्या ‘द रिव्हर ट्रेन’ला इफ्फीत रजत मयूर पुरस्कार; नावीन्यपूर्ण कथाकथनाचा आंतरराष्ट्रीय गौरव!

५७व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष परीक्षक पुरस्कार; २०...

‘कांतारा’चा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका; ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा रजत मयूर पुरस्कार!

५७व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनयाचा गौरव; सन्मानचिन्हासह १५...

व्यंगचित्रकारांची मुस्कटदाबी सहन करणार नाही; शिवसेना आणि व्यंगचित्रकार रस्त्यावर!

कार्टूनिस्ट्स कंबाइनचे इन्स्टाग्राम पेज बंद केल्याने संताप; अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या...

आता एनडीएमध्ये जाण्याची धडपड, मग अजितदादांना त्रास का दिला? अमोल मिटकरींचा शरद पवार गटाला सवाल

‘यांच्या राजकारणामुळे सोन्यासारखा माणूस गमावला’; रोहित पवार पक्षात एकटे...