भाजप नेत्यांचे लाडके शुभारंभ लॉन्सलाही तडाखा; डीपी रोडवर तब्बल २ लाख ३९ हजार चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली!

Date:

नदीकिनाऱ्यावरील बड्या लॉन्स आणि हॉटेल्सवर महापालिकेची धडक कारवाई; दिवंगत महापौर मुक्ता टिळक यांच्या कार्यकाळानंतर अनेक वर्षांनी पुन्हा मोठी मोहीम

पुणे : म्हात्रे पूल ते राजाराम पूल यादरम्यान डीपी रोडवरील मुठा नदीकिनारी असलेल्या बड्या लॉन्स आणि हॉटेल व्यावसायिकांच्या अतिक्रमणांविरोधात शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) पुणे महानगरपालिकेने धडक कारवाई केली. या मोहिमेत एकूण २ लाख ३९ हजार ४८० चौरस फूट क्षेत्रावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. विशेष म्हणजे, भाजपच्या अनेक बड्या नेत्यांच्या बैठका आणि राजकीय कार्यक्रमांचे ठिकाण राहिलेल्या शुभारंभ लॉन्सलाही या कारवाईत वगळण्यात आले नाही.

कारवाईची आकडेवारी :

  • व्यावसायिकांनी स्वतःहून हटविलेली अतिक्रमणे – १,०६,९५० चौरस फूट.
  • महापालिकेने निष्कासन केलेले क्षेत्र – १,३२,५३० चौरस फूट.
  • एकूण अतिक्रमणमुक्त क्षेत्र – २,३९,४८० चौरस फूट.

मुठा नदीकिनाऱ्यावरील या भागात अवघ्या १० टक्के बांधकामाला परवानगी असताना प्रत्यक्षात संपूर्ण जागेचा व्यावसायिक वापर केला जात असल्याचा मुद्दा उपस्थित होत आला आहे. मोठमोठे लॉन्स, हॉटेल्स आणि अन्य व्यावसायिक आस्थापनांमुळे या परिसरातील वाहतुकीचाही प्रश्न गंभीर बनला आहे.

उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाचा दाखला

महापालिकेची कारवाई सुरू झाल्यानंतर काही व्यावसायिकांनी सन २०१७ मध्ये उच्च न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळविल्याचे सांगत त्याची प्रत दाखविण्याचा प्रयत्न केला.

मात्र, फ्रंट मार्जिन, साईड मार्जिन आणि बॅक मार्जिनमधील अतिक्रमणे तसेच वाहनतळाच्या समस्येचा मुद्दा उपस्थित करीत महापालिकेने कारवाई सुरू ठेवली. व्यावसायिक आस्थापनांच्या परिसरात उभी राहणे अपेक्षित असलेली वाहने थेट रस्त्यावर उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची प्रशासनाची भूमिका होती.

शुभारंभ लॉन्सलाही महापालिकेचा तडाखा

भाजपच्या अनेक बड्या नेत्यांच्या बैठका, मेळावे आणि राजकीय कार्यक्रम ज्या शुभारंभ लॉन्समध्ये झाले आहेत, त्या ठिकाणीही महापालिकेने कारवाई केली. अयोध्यासह परिसरातील अनेक व्यावसायिक आस्थापनांवर निष्कासनाची मोहीम सुरू होती.

दरम्यान, दुपारपर्यंत महालक्ष्मी तसेच या परिसरात अनधिकृतपणे सुरू असल्याचा आरोप असलेल्या एका पबवर कारवाई झालेली नव्हती.

मुक्ता टिळक यांच्या महापौरपदाच्या काळानंतर पुन्हा महापालिकेचा हातोडा!

पुण्याच्या तत्कालीन महापौर दिवंगत मुक्ता टिळक यांनी आपल्या महापौरपदाच्या कारकिर्दीत मुठा नदीकिनाऱ्यावरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे समूळ हटविण्याची घोषणा केली होती. त्यांच्या कार्यकाळात या परिसरात महापालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाईही केली होती.

त्यानंतर अनेक वर्षांनी पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाने या परिसरातील बड्या व्यावसायिकांच्या अतिक्रमणांकडे मोर्चा वळविला आहे.

आता आव्हान कारवाईतील सातत्याचे!

छोट्या व्यावसायिकांप्रमाणेच बड्या व्यावसायिकांवरही समान निकषांनुसार कारवाई होणे अपेक्षित आहे. म्हात्रे पूल ते राजाराम पूल यादरम्यान सुरू झालेली ही मोहीम कितपत सातत्याने चालणार, उर्वरित व्यावसायिक आस्थापनांवरही कारवाई होणार का आणि मुठा नदीकिनाऱ्यावरील अतिक्रमणे कायमस्वरूपी हटविली जाणार का, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देश तोडण्याचा भाजपचा कट; सुप्रिया सुळेंच्या पक्षाने पाठिंबा दिल्यास तो संविधानाचा अपमान ठरेल : प्रणिती शिंदे

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून भाजपसह शरद पवार गटावर घणाघाती टीका;...

पुण्यात दुकानासमोर, रस्त्यावर कचरा टाकाल तर लाखाचा दंड; वारंवार नियम मोडल्यास दुकान सील, फेरीवाल्यांचा परवाना रद्द!

महापालिकेचा कठोर पवित्रा; दुकानदार, फेरीवाले आणि मंडई व्यावसायिकांसाठी स्वच्छतेचे...

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांतून सामाजिक समतेची प्रेरणा घ्यावी – डॉ. नीलम गोऱ्हे

महात्मा फुले यांना भारतरत्न मिळावे आणि फुले वाड्याच्या विकासाला...