पुण्यात दुकानासमोर, रस्त्यावर कचरा टाकाल तर लाखाचा दंड; वारंवार नियम मोडल्यास दुकान सील, फेरीवाल्यांचा परवाना रद्द!

Date:

महापालिकेचा कठोर पवित्रा; दुकानदार, फेरीवाले आणि मंडई व्यावसायिकांसाठी स्वच्छतेचे नियम बंधनकारक

पुणे : शहरातील सार्वजनिक स्वच्छतेबाबत पुणे महानगरपालिका प्रशासनाने कठोर पवित्रा घेतला आहे. अतिक्रमणांविरोधातील कारवाईपाठोपाठ आता अस्वच्छता करणाऱ्या दुकानदार, फेरीवाले आणि मंडई व्यावसायिकांवरही महापालिकेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छतेच्या नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार असून, पाचव्यांदा नियम मोडल्यास दुकान सील अथवा फेरीवाला परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरातील दुकानदार, व्यावसायिक आस्थापना, फेरीवाले आणि मंडई व्यावसायिकांसाठी स्वच्छतेविषयक नियम लागू करण्यात आले आहेत.

फेरीवाले आणि मंडई व्यावसायिकांसाठी नियम

  • व्यवसायाची जागा आणि आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणे बंधनकारक.
  • ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे जमा करण्यासाठी दोन स्वतंत्र कचराकुंड्या ठेवणे आवश्यक.
  • सार्वजनिक रस्ते आणि पदपथांवर कचरा टाकण्यास मनाई.

दुकानदार आणि व्यावसायिक आस्थापनांसाठी नियम

  • प्रत्येक दुकानासमोर कचराकुंडी ठेवणे बंधनकारक.
  • दुकान आणि आसपासच्या परिसराची स्वच्छता राखणे आवश्यक.
  • रस्त्यावर अथवा पदपथावर कचरा टाकण्यास मनाई.
  • कचरा केवळ महानगरपालिकेच्या कचरा संकलन वाहनाकडेच सुपूर्द करावा.

नियम मोडल्यास किती दंड?

  • पहिल्यांदा उल्लंघन – १० हजार रुपये.
  • दुसऱ्यांदा उल्लंघन – २० हजार रुपये.
  • तिसऱ्यांदा उल्लंघन – ५० हजार रुपये.
  • चौथ्यांदा उल्लंघन – एक लाख रुपये.
  • पाचव्यांदा उल्लंघन – फेरीवाल्यांचा परवाना रद्द अथवा दुकान किंवा व्यावसायिक आस्थापना सील करण्याची कारवाई.

आता केवळ अतिक्रमणांवरच नव्हे, तर अस्वच्छतेवरही बडगा!

शहरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेची मोहीम सुरू असतानाच आता व्यावसायिकांकडून होणाऱ्या अस्वच्छतेलाही आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर नियम लागू केले आहेत.

शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ महापालिकेची नसून, प्रत्येक व्यावसायिकाचीही आहे. त्यामुळे दुकानदार आणि फेरीवाल्यांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छता राखावी, अन्यथा कठोर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देश तोडण्याचा भाजपचा कट; सुप्रिया सुळेंच्या पक्षाने पाठिंबा दिल्यास तो संविधानाचा अपमान ठरेल : प्रणिती शिंदे

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून भाजपसह शरद पवार गटावर घणाघाती टीका;...

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांतून सामाजिक समतेची प्रेरणा घ्यावी – डॉ. नीलम गोऱ्हे

महात्मा फुले यांना भारतरत्न मिळावे आणि फुले वाड्याच्या विकासाला...

पथक गेले की पुन्हा अतिक्रमण ! रविवार पेठेतील अतिक्रमणाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणार : महापौर मंजुषा नागपुरे

कारवाईची माहिती आधीच फुटत असल्याची व्यापाऱ्यांची तक्रार; बाजारपेठ अतिक्रमणमुक्त...