कोमल डहाके यांच्या हत्येप्रकरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय चौबे यांच्याकडे पाठपुरावा

Date:

आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी मदत कक्ष सुरू करून समुपदेशन आणि मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करावी, अशी डॉ. गोऱ्हे यांची मागणी

पुणे | हिंजवडी आयटी पार्क परिसरात कार्यरत असलेल्या २७ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता कोमल राजेंद्र डहाके यांच्या हत्येप्रकरणी विधानपरिषदेच्या माजी उपसभापती तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय चौबे यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांना वेळीच मदत मिळावी, यासाठी आयटी कंपन्यांनी आपल्या आस्थापनांमध्ये मदत कक्ष सुरू करावेत आणि समुपदेशन व मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०५६/२६ दाखल आहे. स्त्री आधार केंद्राच्या आश्लेषा खंडागळे व रंजना पवार तसेच हिंजवडी महिला दक्षता समितीच्या सदस्या साधना साखरे व वंदना साखरे यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन तपास अधिकारी संदीप वांगणेकर यांच्याकडून प्रकरणाची माहिती घेतली.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मूळच्या वर्धा येथील कोमल आणि या प्रकरणातील आरोपी शुभम ज्ञानेश्वर काळबांडे (वय ३२) यांची तीन वर्षांपासून ओळख होती. शुभम हाही सॉफ्टवेअर अभियंता असून दोघांच्या विवाहाला त्यांच्या कुटुंबीयांची संमती होती. शुभमचे दुसऱ्या एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये यापूर्वीही वाद होत होते. रविवारी रात्री पुन्हा वाद झाल्यानंतर शुभमने कोमल यांच्या डोक्यावर आणि गळ्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असा आरोप आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कोमल यांचा मृत्यू झाला.

उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी घरापासून दूर राहून आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका होतकरू तरुणीला अशा प्रकारे जीव गमवावा लागणे अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे, अशी भावना डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

संविधान दिनानिमित्त CJP चे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजित दीपके व सहसंयोजक आशुतोष रांका नागपूर दौऱ्यावर

‘संविधान बचाओ’ विषयावर संविधान चौकात विशेष कार्यक्रम; सौरभ दास...

गुरुनानक देवजींचा मानवतेचा संदेश संपूर्ण विश्वासाठी दिशादर्शक – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

प्रकाशपर्वानिमित्त पुण्यातील गुरु नानक दरबार गुरुद्वाराला भेट; शीख बांधवांशी...

मोठी झाडे तोडून छोटी रोपे लावणे, हेच का पर्यावरण संवर्धन? एनआयबीएम रोडवरील वृक्षतोडीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन!

मोदी–देवेंद्र सरकारच्या ‘सेव्ह फॉरेस्ट’ अभियानावर ॲड. तोसिफ शेख यांचा...