सावरकरांचा घोर अपमान करणाऱ्या सरसंघचालक गोलवलकर यांचे ‘बंच ऑफ थॉट्स’ पुस्तक शिंदेसेना फाडणार का?: सचिन सावंत

Date:

भाजप नेते अरुण शौरी यांनी The New icon– Savarkar and the Facts पुस्तकातही हेच सत्य सांगितले, त्यांचेही पुस्तक शिंदे सेना फाडणार का?

सावरकरांनी दहावेळा माफीनामे दिल्याचे सावरकरांचे पणतू सात्यकी यांनीच पुणे न्यायालयात स्पष्ट केले, सावरकर यांची खरी अवहेलना उजव्या विचारधारेच्या लोकांकडूनच.

मुंबई, दि. १९ नोव्हेंबर २०२६

काँग्रेस संसदीय दलच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी यांच्या Belonging: A Journey of Love या पुस्तकात सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी पुस्तक फाडले व या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली. शिंदेसेनेला सावरकरांचा अपममान झाला असे वाटत असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक गोलवलकर यांनी त्यांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ पुस्तकात सावरकांचे हिंदुत्व नकारात्मक होते असे म्हणत त्यांचा ‘राष्ट्रद्रोही’ असा उल्लेख केला आहे. सावरकरांना ‘राष्ट्रद्रोही’ म्हटलेले ‘बंच ऑफ थॉट्स’ हे पुस्तक शिंदेसेना फाडणार का? आणि संघ विचाराच्या सरकारमधून बाहेर पडणार का? असे प्रश्न काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व तेलंगणाचे सहप्रभारी सचिन सावंत यांनी विचारले आहेत.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना सचिन सांवत पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा विचार खोक्यापासून सुरु होऊन खोक्यापर्यंत संपतो, त्यांना संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचाराला उत्तर विचाराने द्यायचे असते याची माहिती नाही. ज्या पाच प्रवक्त्यांनी सोनियाजी गांधी यांचे पुस्तक फाडले ते वेगवेगळ्या पक्षातून शिंदेसेनेत आलेले आहेत, त्यांना स्वतःचा विचारही नाही. सोनियाजी यांनी त्यांच्या पुस्तकातील पान क्रमांक २०१ वर सावरकर यांच्या बद्दल ओझरता उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी जे लिहिले ते ऐतिहासिक सत्य आहे. सोनियाजी गांधी यांची आजवरची राजकीय कारकीर्द ही गांधीजींच्या सत्य व अहिंसा या तत्वाशी निगडीत राहिलेली आहे. शिंदे सेनेच्या लोकांचा अभ्यास असता तर असा मुर्खपणा त्यांनी केला नसता. दुसरे असे की भाजपाचे नेते अरूण शौरी यांचे The New icon– Savarkar and the Facts, या पुस्तकातही हेच सत्य सांगितले आहे, त्यांचेही पुस्तक शिंदेसेना फाडणार आहे का? पुणे न्यायालयात राहुल गांधी विरुद्ध सात्यकी सावरकर यांच्यातील सावरकर बदनामी खटल्यात, सावरकरांनी दहा वेळा माफीनामे दिले होते हे सात्यकी सावरकरांनी मान्य केले आहे. या साक्षित सात्यकी यांनी वीर उपाधीपासून माफीनामे, पेंशन, मुस्लीम लीग बरोबरच सरकार स्थापन करणे, गांधी हत्येच्या संदर्भातील संबंध यावरही भाष्य केलेले आहे, असेही सावंत म्हणाले.

सोनियाजी गांधी यांच्या पुस्तकातील उल्लेखापेक्षा सावरकर यांचा भयंकर अपमान गोळवलकर यांनी केलेला आहे, अरूण शौरी यांच्या पुस्तकातही अपमान केलेला आहे असे असूनही एकनाथ शिंदे यांचा गट आज त्याच विचारसरणीच्या पक्षात सत्तेत मांडीला मांडू लावून बसलेला आहे. सावरकर यांची खरी अवहेलना उजव्या विचारधारेच्या लोकांकडूनच सुरु आहे. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी असो अथवा त्यांच्या नावाने राजकारण, यातून सावरकरांचा अपमान हीच मंडळ करत आहे, असेही सचिन सावंत म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सावरकरांबाबतच्या पुस्तकातील मांडणीवर उबाठाने भूमिका स्पष्ट करावी : डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर अधिवेशनात शेतकरी, दुष्काळ, महिला सुरक्षा आणि कारागृहांतील महिलांचे...

चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला कोथरुडकरांचा प्रतिसाद

दुष्काळी मदतीसाठी कोथरुडकर सरसावले समुत्कर्षच्या माध्यमातून १० टन धान्याची पहिली...