अजितदादांचा विकासाचा वारसा आणि अपूर्ण स्वप्नं पूर्ण करण्यासाठी खंबीरपणे उभी आहे – उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार

Date:

पुणे जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देण्याचा निर्धार; अजितदादांच्या कार्याचा गौरव म्हणजे जनसेवेच्या विचारांचा सन्मान – सुनेत्रावहिनी पवार

पुणे जिल्हा परिषदेत अजितदादांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रवेशद्वाराचे नामकरण

📍 जिल्हा परिषद, पुणे | दि. १६ नोव्हेंबर २०२६

पुणे : लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि पुणे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराचे नामकरण आज माननीय केंद्रीय गृह व सहकार मंत्री श्री. अमितभाई शाह यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करत अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन केले.

याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री श्री. मुरलीधरजी मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना सुनेत्रावहिनी म्हणाल्या की, आजचा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक आहे. दादांची सहचारिणी म्हणून त्यांचा कामाचा वेग, विकासाची दूरदृष्टी आणि सामान्य माणसाविषयीची तळमळ मी जवळून अनुभवली आहे. ज्या पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, त्याच जिल्हा परिषदेमध्ये आज त्यांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे, ही भावना शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्याबद्दल दादांच्या मनात विशेष आदर होता. महाराष्ट्र, शेती, सहकार आणि विकासाच्या विविध प्रश्नांसाठी दादा त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत असत. आज अमितभाईंनी दादांच्या कार्याचा गौरव करताना पिंपरी-चिंचवडच्या स्वच्छता सर्वेक्षणातील यशासाठी दादांनी घेतलेल्या २९ बैठकांचा विशेष उल्लेख केला. अजितदादांचा राजकीय प्रवास युवा नेत्यांसाठी एका विद्यापीठाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीही दादांच्या राजकीय कारकिर्दीतील आठवणींना उजाळा देत त्यांच्या विकासकार्याचा गौरव केला.

सुनेत्रावहिनी पुढे म्हणाल्या की, दादांनी पुणे जिल्ह्याच्या विकासाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले. शिक्षण, आरोग्य, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि ग्रामस्वच्छता या क्षेत्रांत जिल्हा परिषदेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ३०३ मॉडेल स्कूल, १०८ मॉडेल आरोग्य केंद्रांचे उद्दिष्ट, विद्यार्थ्यांचे यश आणि विविध अभियानांतील जिल्ह्याची कामगिरी ही दादांच्या विकासदृष्टीचीच फलश्रुती आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात जिल्हा परिषदेला द्वितीय क्रमांक मिळाला असला, तरी दादांचे स्वप्न प्रथम क्रमांकाचे होते. ते स्वप्न पूर्ण करण्याचा माझा निर्धार आहे.

मी एका संघर्षयोद्ध्याची सहचारिणी आहे. दादांची अपूर्ण स्वप्ने, त्यांचे विचार आणि विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी मी खंबीरपणे उभी आहे. आज उभारण्यात आलेला पुतळा आणि नामकरण करण्यात आलेले प्रवेशद्वार हे केवळ स्मारक न राहता जनसेवेची प्रेरणा देणारे केंद्र ठरावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हा परिषदेमध्ये आयोजित अजितदादांच्या छायाचित्र प्रदर्शनालाही सर्व मान्यवरांसह भेट देण्यात आली. या प्रदर्शनातून दादांच्या आयुष्यातील विविध प्रसंग, राजकीय प्रवास, जनसेवेचा ध्यास आणि विकासकामांच्या आठवणींना उजाळा मिळाला.

अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला असला, तरी त्यांनी सुरू केलेला विकासाचा प्रवास थांबणार नाही. पुणे जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने करण्याचा आणि सामान्य जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प आपण सर्वांनी करूया, असे आवाहनही सुनेत्रावहिनी यांनी केले.

यावेळी मंत्रिमंडळातील सहकारी, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गांधी-नेहरू यांच्या विचारांमुळेलोकशाही आजही मजबूत-रमणिक मुनीजी महाराजसाहेब

पुणे : महात्मा गांधींनी घडविलेली अहिंसक मने आणि द्वेष...

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची भारतीय जैन संघटनेच्या मुख्यालयास भेट

पुणे, १६: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज...

केंद्र सरकारच्या विविध पदांवर थेट भरती; यूपीएससीकडून ऑनलाइन अर्ज मागवले

जाहिरात क्रमांक १३/२०२६ प्रसिद्ध; पात्र उमेदवारांना ४ डिसेंबरपर्यंत अर्ज...