केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची भारतीय जैन संघटनेच्या मुख्यालयास भेट

Date:

पुणे, १६: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जैन संघटना (बीजेएस) आणि शांतीलाल मुथ्था फाउंडेशन (एसएमएफ) यांच्या पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीमती सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह संस्थेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था आदी उपस्थित होते.

या प्रसंगी श्री. शाह यांनी, बीजेएस आणि एसएमएफ यांच्या ४२ वर्षांच्या प्रवासाची, सामाजिक योगदानाची आणि विविध उपक्रमांची माहिती घेऊन या संस्थांच्या कार्याचे कौतुक केले.

श्री. मुथ्था यांनी जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, मूल्यवर्धन कार्यक्रम, आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन तसेच सामाजिक विकासाच्या क्षेत्रांत संस्थेने केलेल्या कार्याची माहिती सादर केली.

कार्यक्रमास भारतीय जैन संघटनेचे विश्वस्त वल्लभ भन्साळी, अभय फिरोदिया, व्यवस्थापकीय संचालक कोमल जैन, राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर सांकला आदी उपस्थित होते.

सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक कार्यालयास भेट
तत्पूर्वी श्री. शाह आणि अन्य मान्यवरांनी नव्याने स्थापन झालेल्या सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक यांचे पश्चिम विभागीय कार्यालयास भेट देऊन पाहणी केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गांधी-नेहरू यांच्या विचारांमुळेलोकशाही आजही मजबूत-रमणिक मुनीजी महाराजसाहेब

पुणे : महात्मा गांधींनी घडविलेली अहिंसक मने आणि द्वेष...

अजितदादांचा विकासाचा वारसा आणि अपूर्ण स्वप्नं पूर्ण करण्यासाठी खंबीरपणे उभी आहे – उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार

पुणे जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देण्याचा निर्धार; अजितदादांच्या कार्याचा...

केंद्र सरकारच्या विविध पदांवर थेट भरती; यूपीएससीकडून ऑनलाइन अर्ज मागवले

जाहिरात क्रमांक १३/२०२६ प्रसिद्ध; पात्र उमेदवारांना ४ डिसेंबरपर्यंत अर्ज...