रब्बी ज्वारीच्या बियाण्यांसाठी ५० टक्के अनुदान; महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

Date:

पौष्टिक तृणधान्य उप अभियानांतर्गत शेतकरी गटांना पीक प्रात्यक्षिकांसाठी १०० टक्के अनुदान

पुणे, दि. १७ : राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण उप अभियान-पौष्टिक तृणधान्य (NFSNM-NC) अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षात रब्बी हंगामासाठी प्रमाणित ज्वारी बियाण्यांचे ५० टक्के अनुदानावर वितरण करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार असून, पात्र शेतकरी व शेतकरी गटांनी संबंधित घटकांसाठी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन कृषी आयुक्तांनी केले आहे.

या अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे वितरण या घटकाचा लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यामध्ये दहा वर्षांच्या आतील वाणांसाठी प्रतिकिलो ३० रुपये, तर दहा वर्षांवरील वाणांसाठी प्रतिकिलो १५ रुपये अनुदान अनुज्ञेय आहे. तसेच, पीक प्रात्यक्षिके या घटकांतर्गत शेतकरी गटांना बियाणे घटकासाठी १०० टक्के अनुदानाचा लाभ मिळणार आहे. या दोन्ही घटकांचे उद्दिष्टांक महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या अभियानाच्या माध्यमातून प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिकांसोबतच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, शेतकरी प्रशिक्षण तसेच जिल्हास्तरीय कृषी महोत्सव असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांमुळे पौष्टिक तृणधान्य पिकांचे उत्पादन वाढविणे, सुधारित तंत्रज्ञानाचा प्रसार करणे आणि शेतकऱ्यांना आधुनिक कृषी पद्धतींची माहिती उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
पात्र शेतकरी व शेतकरी गटांनी प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिके या घटकांसाठी “महाडीबीटी पोर्टल” (https://mahadbt.maharashtra.gov.in) येथे जाऊन Farmer Login द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत. अभियानातील इतर उपक्रमांची माहिती व लाभ मिळविण्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात रॅपिडोविरोधात गुन्हा दाखल; विनापरवाना बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी परिवहन विभागाची कारवाई!

विश्रांतवाडी परिसरात दुचाकी जप्त; ‘रिक्षाचालकांच्या कायदेशीर लढ्याला यश’ —...

श्री महालक्ष्मी मंदिराच्या चित्रकला स्पर्धेत आराध्य लांडे, सई लांडगे प्रथम

हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग; एक लाख सहा हजार रुपयांची पारितोषिके पुणे...

आकाशात भरारी घेणाऱ्या महिला वैमानिकांचा सन्मान

नवरात्रीत श्री महालक्ष्मी ट्रस्टच्या वतीने स्त्रीशक्तीचा जागर पुणे : आकाशात...

आयडीबीआय बँकेची विक्री बेकायदेशीर; केंद्र सरकारचा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक – विश्वास उटगी

*नफ्यातील राष्ट्रीयीकृत बँक विदेशी कंपनीला विकण्याचा घाट; आत्मनिर्भरतेचे खच्चीकरण...