पुण्यात १६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान ‘प्रवाह बिझनेस एक्स्पो २०२६’

Date:

पुणे : अग्रवाल समाज पुणे यांच्या वतीने ‘प्रवाह बिझनेस एक्स्पो २०२६’ या तीन दिवसीय व्यवसाय प्रदर्शनाचे आयोजन १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान डेक्कन कॉलेज मैदान, पुणे येथे करण्यात आले आहे. ‘सोच से सफलता तक’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनाच्या माध्यमातून उद्योजक, व्यावसायिक, उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांना एकाच व्यासपीठावर आणून व्यवसायवृद्धी, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचा उद्देश आहे. अशी माहिती अग्रवाल समाज पुणेचे अध्यक्ष ईश्वरचंद गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी अग्रवाल समाज पुणेचे सेक्रेटरी संजय अग्रवाल, कोषाध्यक्ष दीपक बंसल, सहसचिव मुकेश कनोडीया आदि मान्यवर उपस्थित होते. 

या प्रदर्शनात विविध क्षेत्रांतील व्यावसायिक कंपन्या आणि उद्योजक सहभागी होणार असून, त्यांच्या उत्पादनांचे व सेवांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. यासोबतच प्रमुख व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे, व्यावसायिक नेटवर्किंग आणि सामुदायिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतील व्यावसायिकांच्या सहभागामुळे नवीन व्यावसायिक संबंध निर्माण करण्याची आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. या प्रदर्शनात सर्व समाजातील नागरिकांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी, १६ ऑक्टोबर रोजी उद्घाटन समारंभ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यानंतर  ‘लीडरशिप लेगसी’ या विषयावरील चर्चासत्र, महिला नेतृत्व आणि व्यवसायवृद्धी यांवरील सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. त्यानंतर अग्रवाल समाजासाठी दांडिया नाईटचे आयोजन करण्यात येणार आहे.

१७ ऑक्टोबर रोजी ‘महासंगम समिट’, ब्रँडनिर्मिती आणि नफावाढ या विषयावरील विशेष व्याख्यान, ‘व्हिजनरी लीडर्स’ चर्चासत्र तसेच ‘आरोग्य संवाद : हेल्थ फर्स्ट’ हा आरोग्यविषयक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

प्रदर्शनाच्या अंतिम दिवशी, १८ ऑक्टोबर रोजी ‘वॉक ओव्हर कॉफी’, युवकांसाठी विशेष उपक्रम, करिअर समुपदेशन, पुरस्कार वितरण आणि अग्रसेन जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात विविध उद्योग क्षेत्रांतील नामवंत उद्योजक आणि व्यावसायिक सहभागी होणार आहेत. त्यामध्ये क्विक हील टेक्नॉलॉजीजचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक कैलाश काटकर, डायनॅमिक इंडिया ग्रुपचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सोनू शर्मा आणि शेल्स अॅडव्हर्टायझिंग इन्क.चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय अरोरा यांचा समावेश आहे. याशिवाय निलॉन्स एंटरप्रायझेस, चितळे बंधू, रांका ज्वेलर्स यांसह अन्य संस्थांमधील प्रतिनिधीही विविध सत्रांमध्ये सहभागी होणार आहेत.

व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध करून देतानाच ज्ञान, नेतृत्वगुण आणि सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देणारे व्यासपीठ निर्माण करण्याचा अग्रवाल समाज पुणे यांचा या उपक्रमामागील उद्देश आहे. उद्योजकता आणि सामूहिक प्रगतीचा उत्सव साजरा करण्याची संधी या प्रदर्शनातून मिळणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माले ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी; बोगस ग्रामसभा, बनावट कार्यवृत्त-ठरावांच्या आरोपांची अधिकाऱ्यांकडून पडताळणी

मुळशी : तालुक्यातील माले ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत गंभीर तक्रार दाखल...

माझी FDA मधून बदली झालेली नाही; निकृष्ट औषधं अन् भेसळीविरुद्धचा लढा सुरूच राहील – तुकाराम मुंढे

पुणे, 13 ऑक्टोबर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांतील कथित...

पुण्यात 15 ऑक्टोबरपासून दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद; महापालिकेचा मोठा निर्णय

पुणे : अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमानात झालेली घट...