ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Date:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन; कुटुंबीयांचे केले सांत्वन

पुणे, दि. ८ : ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर आज डोणजे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.

यावेळी खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार भाई जगताप, हेमंत पाटील, अनिकेत तटकरे, गोपीचंद पडळकर, अमित गोरखे, भिमराव तापकीर, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार,
महापौर मंजुषा नागपुरे, सभापती युवराज काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल,
यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

मराठी रंगभूमी तसेच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नाना पाटेकर यांनी आपल्या प्रभावी अभिनयाने स्वतंत्र ओळख निर्माण केली. प्रदीर्घ कलाप्रवासात त्यांनी विविधांगी भूमिका साकारत रसिकांच्या मनावर ठसा उमटविला. अभिनयासोबतच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले.

अंत्यसंस्कारापूर्वी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी डोणजे येथे नागरिक, कलाकार, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, चाहते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी अंत्यदर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

पोलिस दलाच्यावतीने शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नाना पाटेकरांचे पार्थिव पुण्यात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली

राज्य सरकारतर्फे मानवंदना; डोणजे येथील फार्महाऊसवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पुणे...

नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; अभिनय, संवेदनशीलतेचा भारदस्त चेहरा काळाच्या पडद्याआड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना...

सीएसआर गुंतवणुकीचा सामाजिक परिणाम मोजणे आवश्यक ; पुण्यात राष्ट्रीय सल्लामसलत

पुणे, दि. ८ : कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (CSR) अंतर्गत...