श्री महालक्ष्मी देवीला २ किलो वजनाचा सोन्याचा मुकुट

Date:

दसऱ्याच्या दिवशी श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करणार

श्री महालक्ष्मी मंदिरातील ‘सार्वजनिक नवरात्रोत्सव’ रविवारपासून (दि.११) ,

धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम ; श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे होणार नारीशक्तीचा सन्मान

पुणे :  श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ (घटस्थापना) ते मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ (दसरा) या कालावधीत साजरा होणार आहे. संपूर्ण उत्सवात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या हस्ते आरती, तसेच त्यांचा सन्मान सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे. तसेच धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती मंदिर ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला मंदिर ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल, ॲड. प्रताप परदेशी, उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते.

अमिता अग्रवाल म्हणाल्या, रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी (घटस्थापना) सकाळी ९ वाजता बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे आणि सुप्रिया बडवे यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. तसेच, सायंकाळी ६ वाजता मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते होईल. ‘शृंगार’ या संकल्पनेवर आधारित मंदिरात आकर्षक सजावट करण्यात येणार असून मंदिराचे भव्य प्रवेशद्वार देखील या संकल्पनेवर साकारले जाणार आहे. याशिवाय दहा दिवसांत अभिषेक, याग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये होणार आहेत. सर्व धार्मिक कार्यक्रमांचे पौरोहित्य मिलिंद राहूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली होईल.

श्री महालक्ष्मी देवीला सोन्याचा मुकुट
यंदा  ‘शृंगार’ हा संकल्पना असून याला अनुसरून घटस्थापनेच्या दिवशी श्री महालक्ष्मी देवीला नवा सोन्याचा मुकुट परिधान करण्यात येणार आहे. हा मुकुट २ किलो वजनाचा असून यामध्ये आकर्षक नक्षीकाम व कलाकुसर करण्यात आली आहे. यामुळे भक्तांना मुकुट परिधान केलेले देवीचे मनोहारी रूप पाहण्याची संधी पहिल्या दिवसापासून मिळणार आहे.

सामुहिक श्रीसूक्त पठण आणि महिलांचा सन्मान सोहळा
उत्सव प्रमुख डॉ.तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता सामूहिक महिला व पुरुष यांच्यासाठी श्रीसूक्त पठण होणार आहे. यामध्ये हजारो महिला व पुरुष देवीभक्त सहभागी होणार आहेत. महापौर मंजुषा नागपुरे यावेळी उपस्थित राहणार असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सोमवार (दि.१२) पासून दररोज सायंकाळी ५ वाजता विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला शक्तीचा सन्मान मंदिरात होणार आहे. यामध्ये अनुक्रमे अन्नदाता शक्ती : महिला शेतकरी व कृषी उद्योजिका, महिला शास्त्रज्ञ, महिला पोलीस अधिकारी, महिला वैमानिक, महिला जिल्हाधिकारी, विविध कंपन्यांमधील महिला मानव संसाधन व्यवस्थापक, नारी तू नारायणी : उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला, महिला उद्योजिकांच्या सन्मान सोहळ्याचा समावेश आहे.

यंदाचे वैशिष्ट्य : अष्टलक्ष्मी भव्य मिरवणूक, जिवंत देखावा
मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता अष्टलक्ष्मी भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. तसेच ललिता पंचमीला गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता कन्यापूजन कार्यक्रम आणि शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी गाथा शिवशंभूंची हा जिवंत देखावा ही यंदाच्या उत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

याशिवाय रक्तदान व आरोग्य शिबीर, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, ढोल-ताशा वादनसेवा, नृत्यातून देवी आराधना, बँजो वादन, माता की चौकी यासह सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता मंदिरासमोर सामूहिक गरबा होणार आहे. धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा, समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा सार्वजनिक नवरात्रोत्सव महालक्ष्मी मंदिरात दर वर्षीप्रमाणे यंदाही साजरा होणार आहे.

दसरा : श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी व रावण दहन कार्यक्रम
दसऱ्याच्या दिवशी मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात येणार आहे. तर रात्री ९.३० वाजता भव्य दिव्य रावणदहन कार्यक्रम देखील होणार आहे. विश्वकर्मा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भव्य रावणाची प्रतिकृती साकारली आहे. उत्सवात महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रांतील मान्यवर मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार आहेत.

भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ५ कोटी रुपयांचा विमा घेण्यात आला आहे व मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात ५० सीसीटीव्ही कॅमेरे आणि ५० हून अधिक सुरक्षारक्षक असणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आली असून, पुणेकरांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे विश्वस्त मंडळाकडून आवाहन करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

SIR : महाराष्ट्राच्या प्रारूप मतदार यादीतून 2.06 कोटी नावे बाहेर; दुरुस्तीसाठी आतापर्यंत 6.24 लाख अर्ज

पुण्यात सर्वाधिक 56,605 अर्ज; अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबरला मुंबई...

अवैध गर्भलिंग निदानाविरोधात यंत्रणा अधिक सक्रिय करणार : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

विभागीय बैठका आणि साप्ताहिक पाठपुराव्यावर भर; संघटित गुन्ह्यांत मोक्का...

महापौर मंजुषा नागपुरे यांच्या वतीने आँगन का मिलन’ उपक्रम

अंगणवाडी सेविकांच्या सेवाभावाचा सन्मान; बालकांना पुस्तके व खाऊचे वाटप पुणे,...