MPSC अध्यक्ष भीमनवारांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवला; रोहित पवारांचा मोठा दावा

Date:

‘विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आता मुख्यमंत्र्यांच्या इगोचा खेळ बनला’; पुण्यातील आंदोलनातून सरकारवर हल्लाबोल

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता नवे वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवल्याचा दावा केला आहे. हा राजीनामा अद्याप स्वीकारला जात नसल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आता केवळ ‘इगोचा खेळ’ बनल्याचा आरोप त्यांनी केला.

रोहित पवार म्हणाले की, “परवा संध्याकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान भीमनवार यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला. मात्र केवळ मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवून प्रश्न सुटणार नाही. नियमानुसार तो राज्यपालांकडे जाणे आवश्यक आहे.”

‘राजीनामा देऊन विषय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकला’

भीमनवार यांनी राजीनामा थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठवून स्वतःची जबाबदारी बाजूला करण्याचा प्रयत्न केला असावा, असा आरोप रोहित पवार यांनी केला.

“मी राजीनामा दिला आहे, आता मला वाचवायचे की नाही ते तुम्ही ठरवा, अशा प्रकारे विषय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकण्यात आला आहे,” असे ते म्हणाले.

‘हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा नव्हे, इगोचा प्रश्न झाला’

राजीनाम्यावर निर्णय का होत नाही, यावरूनही रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या दबावामुळे अध्यक्षांचा राजीनामा स्वीकारल्यास पुढे सामान्य नागरिक इतर मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांचाही राजीनामा मागू शकतात, अशी भीती सरकारला वाटत असावी, असा दावा त्यांनी केला.

“आता हा विषय विद्यार्थ्यांच्या भविष्याचा राहिलेला नाही. तो मुख्यमंत्र्यांच्या इगोचा खेळ बनला आहे,” अशी टीका रोहित पवार यांनी केली.

कलम 317 अंतर्गत चौकशीची प्रक्रिया

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MPSCच्या आजी-माजी अध्यक्ष आणि सदस्यांबाबत संविधानाच्या कलम 317 अंतर्गत कारवाईसाठी निवृत्त उच्च न्यायालय न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची शिफारस राज्यपालांकडे केली आहे. तीन महिन्यांत अहवाल मागवून त्यानुसार पुढील कारवाई करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. Politics News on Sarkarnama

आंदोलनात राजीनाम्याची मागणी केंद्रस्थानी

पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आयोगाध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी प्रमुख आहे. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, पेपरफुटीच्या आरोपांची चौकशी, भरती प्रक्रिया आणि इतर मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत.

रोहित पवार यांच्या नव्या दाव्यानंतर आता भीमनवार यांच्या कथित राजीनाम्यावर सरकार आणि राजभवन नेमकी काय भूमिका घेतात, याकडे विद्यार्थ्यांसह राज्याचे लक्ष लागले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

EC विरोधात विरोधकांचा मोर्चा रोखला; राहुल-प्रियांका, अखिलेश पोलिसांच्या ताब्यात

‘लोकशाही वाचवा’ मोर्चात 19 विरोधी पक्षांचे खासदार; ज्ञानेश कुमारांच्या...

‘एका दिवसात महाराष्ट्र बंद नाही केला तर नाव बदलेन’; जरांगे पाटीलांचा सरकारला थेट इशारा

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट; अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी, आंदोलन...

पुणे शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटे मैदानात; एकनाथ शिंदेंची घोषणा

AB फॉर्मही दिला; भाजपचे कौस्तुभ गावडे आधीच रिंगणात, महायुतीत...

“त्यासाठी कुणाचे पाय धरायला लागले तरी मी तयार आहे”; राज ठाकरेंनी MPSC आंदोलकांना दिला शब्द

पुणे:पुण्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अनियमित कारभाराविरोधात आणि पेपरफुटी प्रकरणांविरोधात...