दुष्काळामुळे मराठवाड्यातून पुण्यात मोठे स्थलांतर होण्याची शक्यता

Date:

साखर कारखाने केवळ ६० दिवस सुरू राहिल्यास ऊसतोड कामगारांवर बेरोजगारीचे संकट –  देविदास तुळजापूरकर

 पुणे :यंदा राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, मराठवाड्यातील अनेक कुटुंबांना रोजगार आणि उदरनिर्वाहासाठी पुण्याकडे स्थलांतर करावे लागू शकते. साखर कारखाने यंदा केवळ ६० दिवस सुरू राहिल्यास ऊसतोड कामगारांना मिळणारे १८० दिवसांचे काम मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढण्याबरोबरच पुणे शहरातील पायाभूत सुविधांवरही मोठा ताण निर्माण होण्याची शक्यता आहे, असे मत ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ देविदास तुळजापूरकर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल, महाराष्ट्र यांच्या वतीने गांधी भवन, कोथरूड येथे महात्मा गांधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत ‘फिल्म आणि चर्चा’ या कार्यक्रमात बँकिंग क्षेत्रातील आर्थिक घडामोडींवर आधारित दिग्दर्शक व लेखक वरुण सुखराज यांच्या ‘द ग्रेट इंडियन इल्युजन’ या माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या चर्चेत तुळजापूरकर बोलत होते.

तुळजापूरकर म्हणाले, बँकिंग क्षेत्रावर देखरेख ठेवणाऱ्या रिझर्व्ह बँकेला पीएमसी बँकेतील घडामोडी वेळीच का समजल्या नाहीत, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. देशाचे बँकिंग क्षेत्र सक्षम असल्याचे सांगितले जात असले तरी जागतिक आर्थिक संकटाची परिस्थिती पाहता त्याचे परिणाम भारताच्या उंबरठ्यावर येण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी आर्थिक घडामोडी आणि बँकिंग व्यवस्थेची माहिती घेऊन आर्थिकदृष्ट्या साक्षर होणे आवश्यक आहे.

सरकारची रस्ते आणि रेल्वे यांसारखी पायाभूत सुविधा उभारण्याची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे सुरक्षित डिजिटल पायाभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणेही आवश्यक आहे. मात्र, विविध शुल्कांच्या माध्यमातून त्याचा आर्थिक भार ग्राहकांवर पडत आहे. सार्वजनिक बँका तोट्यात गेल्यानंतर सरकारकडून त्यांना भांडवल दिले जाते; मात्र त्याचा अप्रत्यक्ष भार नागरिकांवरच पडतो. त्यामुळे जनकेंद्रित बँकिंग धोरणाची गरज आहे. सध्या बँकिंग धोरण कॉर्पोरेट केंद्रित असल्याची टीकाही त्यांनी केली.

सोन्यातील गुंतवणूक ही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ‘डेड इन्व्हेस्टमेंट’ असल्याचे सांगत तुळजापूरकर म्हणाले, बँकांमधील ठेवी देशाच्या विकासासाठी अधिक महत्त्वाच्या ठरतात. सोन्याच्या किमती भविष्यात अचानक घसरू शकतात. त्यामुळे गुंतवणुकीबाबत नागरिकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे.

ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर म्हणाले, बँकेत नागरिक आपली आयुष्यभराची कमाई ठेवतात. बँक बुडाल्यास त्या पैशांचे काय, हा प्रश्न ‘द ग्रेट इंडियन इल्युजन’ या माहितीपटातून मांडण्यात आला आहे. डिजिटल अर्थव्यवस्थेबाबतचे निर्णय केवळ सत्ताधाऱ्यांनी न घेता नागरिकांनीही त्यावर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. व्यवस्थेतील मनमानीला विरोध करून नियमांवर बोट ठेवण्याची भूमिका नागरिकांनी घेतली पाहिजे.

सहदिग्दर्शक व सहनिर्माते प्रसाद झावरे म्हणाले, समाजात घडणाऱ्या विविध घटनांचे चित्रपटाच्या माध्यमातून एकत्रित चित्र मांडता येते. राजकारण आणि अर्थव्यवस्था या परस्परांशी जोडलेल्या आहेत. चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक जागृतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो.

कार्यक्रमाला महात्मा गांधी स्मारक निधीचे विश्वस्त अन्वर राजन, एम.एस. जाधव, रमेश आढाव, धनंजय कुलकर्णी, प्रवीण सप्तर्षी, आप्पा अनारसे, तेजस भालेराव, सूरज कुलकर्णी, प्रशांत कोठडिया, श्रीरंजन आवटे आदी उपस्थित होते. सायली मनोहर यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. प्रास्ताविक एम.एस. जाधव यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तेजस भालेराव यांनी यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लातूरच्या आदर्श कॅम्पस प्रकरणात कठोर कारवाई करा : डॉ. नीलम गोऱ्हे

पीडितेचे संरक्षण व तीन दिवसांत कार्यवाही अहवाल देण्याबाबत निवेदन लातूर,...

डॉ. स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले

महायुती अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी : रवींद्र चव्हाण पुणे, ता. ५...