तीर्थक्षेत्र व पर्यटन विकासकामांचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आढावा

Date:

पुणे, दि. ५ : पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रे, ऐतिहासिक वारसा स्थळे आणि पर्यटनस्थळांच्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध कामांचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आढावा घेतला. संबंधित विकासकामांची सद्यःस्थिती, प्रगती, आवश्यक प्रशासकीय कार्यवाही आणि निर्धारित कालमर्यादा याबाबत संबंधित विभागांकडून माहिती घेण्यात आली.

राजमाता सईबाई स्मृतीस्थळासाठी आवश्यक भूसंपादन आणि खरेदीखत प्रक्रियेबाबत कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. तसेच राजमाता सईबाई स्मृतीस्थळ आणि संत जगनाडे महाराज स्मारकाच्या कामांची सद्यःस्थिती तपासून निर्धारित कालमर्यादेत आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सिंहगड आणि राजगड किल्ल्यांवरील पर्यटनविषयक सुविधांचाही आढावा घेण्यात आला. पर्यटकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा, सुरू असलेली विकासकामे तसेच संबंधित प्रशासकीय बाबींची माहिती घेण्यात आली. ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा विचार करून विकासकामे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

विविध विकासकामांची गुणवत्ता आणि निर्धारित कालमर्यादा याबाबत संबंधित यंत्रणांनी नियमितपणे आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले. कामांमध्ये होणारी दिरंगाई टाळण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांच्या विकासासाठी विविध आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या कामांचा टप्पानिहाय आढावा घेऊन आवश्यक त्या प्रशासकीय बाबी पूर्ण करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग, पुरातत्त्व विभाग आणि पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

इम्रान खान यांच्या सुटकेसाठी हजारोंचा लाँग मार्च; लक्की मरवतहून इस्लामाबादकडे PTI समर्थकांची कूच

राजधानीत कडेकोट सुरक्षा; कंटेनर लावून प्रमुख मार्ग रोखण्याची तयारी इस्लामाबाद...

विशेष मुलं घेतायेत स्वावलंबनाचे धडे – संदीप खर्डेकर.

" विशेष मुलांना " पणत्या,कॉफी पेंटिंग, रोपं इ तयार...

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदारांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा

पुणे, दि. ५ : भारत निवडणूक आयोगाने पुणे विभागातील...

पुणे महापालिकेवर 45 कोटींचा अनावश्यक भार लादला:घनकचरा विभागावर गंभीर आक्षेप

उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांचे नगरविकास...