विशेष मुलं घेतायेत स्वावलंबनाचे धडे – संदीप खर्डेकर.

Date:

” विशेष मुलांना ” पणत्या,कॉफी पेंटिंग, रोपं इ तयार करण्याचे व “व्यवहाराचे” ही प्रशिक्षण – किशोरीताई पाठक.

क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे उपयुक्त साहित्य भेट – मंजुश्री खर्डेकर.

पुणे- किशोरीताई पाठक संचालित “अब नॉर्मल होम” ला भेट देताना मनस्वी समाधान लाभते कारण येथे विशेष मुलांना स्वावलंबनाचे धडे दिले जातात असे मत क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले. ह्या मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहताना बघून आनंद वाटतो आणि म्हणूनच समाजातील जास्तीतजास्त नागरिकांनी दिवाळी साठी ह्या मुलांनी बनविलेल्या वस्तू खरेदी कराव्यात असेही संदीप खर्डेकर म्हणाले.
आमच्या कडे विशेष मुलांना विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते व त्याच बरोबर त्यांना व्यवहार ज्ञान ही शिकविले जाते जेणेकरून ही मुलं स्वावलंबी होतील असे अब नॉर्मल होम च्या संचालिका किशोरीताई पाठक म्हणाल्या. आम्ही मुलांना रोपं तयार करणे, पणत्या रंगविणे, कॉफी पेंटिंग करणे यासह विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देतो व त्यांची विक्री ही करतो असेही त्या म्हणाल्या.
आज क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे ह्या मुलांना कलरिंग किट, विविध ब्रश, पोस्टर कलर च्या बाटल्या व इतर साहित्य भेट देण्यात आले असून येणाऱ्या काळात जे जे साहित्य लागेल ते क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे देण्यात येईल असे फाउंडेशन च्या विश्वस्त व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.तसेच गांधी भवन कोथरूड येथे अंधशाळे शेजारी ही संस्था कार्यरत असून येथून नागरिक विशेष मुलांनी बनविलेले साहित्य खरेदी करू शकतात असे ही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
यावेळी अब नॉर्मल होम च्या शिक्षिका व प्रशिक्षक मेघना मिठभाकरे,सुजाता जावळे,अवंती राळेगावकर,वैशाली जहागीरदार उपस्थित होत्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

इम्रान खान यांच्या सुटकेसाठी हजारोंचा लाँग मार्च; लक्की मरवतहून इस्लामाबादकडे PTI समर्थकांची कूच

राजधानीत कडेकोट सुरक्षा; कंटेनर लावून प्रमुख मार्ग रोखण्याची तयारी इस्लामाबाद...

तीर्थक्षेत्र व पर्यटन विकासकामांचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आढावा

पुणे, दि. ५ : पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रे, ऐतिहासिक...

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदारांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा

पुणे, दि. ५ : भारत निवडणूक आयोगाने पुणे विभागातील...

पुणे महापालिकेवर 45 कोटींचा अनावश्यक भार लादला:घनकचरा विभागावर गंभीर आक्षेप

उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांचे नगरविकास...