आदिवासी विद्यार्थ्यांना मध्यरात्री अडवून धमक्या; विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

Date:

‘पोलिसी दडपशाही थांबवा, मुख्यमंत्र्यांनी स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधावा’

मुंबई : आपल्या मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना मध्यरात्री रस्त्यातच अडवून त्यांना धमकावण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात असल्याचा दावा करत ही दडपशाही तातडीने थांबवावी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, अशी मागणी त्यांनी केली.

वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. “आदिवासी विद्यार्थी आपल्या मागण्या शांततेच्या मार्गाने मांडण्यासाठी आझाद मैदानावर येत होते. मात्र त्यांना रात्री तीन वाजता वाटेतच अडवण्यात आले. ही कुठल्या प्रकारची लोकशाही?” असा सवाल त्यांनी केला.

विद्यार्थ्यांचे फोटो काढण्यात आले, “तुमच्यावर केसेस करू” अशा शब्दांत धमकावण्यात आले आणि विद्यार्थ्यांना घेऊन येणारी बसही ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

‘आंदोलन सुरू होण्याआधीच चिरडण्याचा प्रयत्न का?’

एखादे आंदोलन सुरू होण्याआधीच ते अशा पद्धतीने रोखण्याचा प्रयत्न होत असेल, तर सरकार नेमके कशाला घाबरत आहे, असा प्रश्नही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

आदिवासी विकास मंत्री आणि संबंधित आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचा विद्यार्थ्यांना घटनात्मक अधिकार आहे. त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याऐवजी पोलिसी बळाचा वापर करून विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांना थेट आवाहन

विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आवाहन करत, “मुख्यमंत्री साहेब, तुम्ही स्वतः या विद्यार्थ्यांना भेटा. त्यांचे म्हणणे ऐकून घ्या आणि त्यांच्यावर सुरू असलेली पोलिसी दडपशाही त्वरित थांबवा,” अशी मागणी केली.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारने संवादातून तोडगा काढावा आणि आंदोलन करण्याच्या त्यांच्या अधिकारात अडथळे निर्माण करू नयेत, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

EC विरोधात विरोधकांचा मोर्चा रोखला; राहुल-प्रियांका, अखिलेश पोलिसांच्या ताब्यात

‘लोकशाही वाचवा’ मोर्चात 19 विरोधी पक्षांचे खासदार; ज्ञानेश कुमारांच्या...

MPSC अध्यक्ष भीमनवारांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवला; रोहित पवारांचा मोठा दावा

‘विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आता मुख्यमंत्र्यांच्या इगोचा खेळ बनला’; पुण्यातील...

‘एका दिवसात महाराष्ट्र बंद नाही केला तर नाव बदलेन’; जरांगे पाटीलांचा सरकारला थेट इशारा

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट; अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी, आंदोलन...