आदिवासी विद्यार्थ्यांच्या कारवाईवर काँग्रेस संतापली; ‘सुटका करा, अन्यथा वर्षा बंगल्याला घेराव’

Date:

विजय वडेट्टीवारांकडून पोलिसी दडपशाहीचा आरोप; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा — ‘वेळ पडली तर वर्षा बंगल्यात घुसायलाही वेळ लागणार नाही’

मुंबई : मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना मध्यरात्री अडवणे, धमकावणे आणि काहींना ताब्यात घेण्याच्या कारवाईवर काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या कारवाईला पोलिसी दडपशाही म्हटले असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अटक केलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची आणि NSUI पदाधिकाऱ्यांची तात्काळ सुटका न केल्यास काँग्रेसचे सर्व नेते मुंबईत येऊन वर्षा बंगल्याला घेराव घालतील, असा इशारा दिला.

नाशिकहून मुंबईकडे लाँग मार्च काढलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी रात्रीच्या मुक्कामासाठी काँग्रेसच्या टिळक भवन मुख्यालयात आश्रय घेतला होता. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, मध्यरात्री पोलिसांनी मुख्यालयात प्रवेश करून विद्यार्थ्यांना धमकावले आणि काहींना ताब्यात घेतले. NSUI अध्यक्ष सागर साळुंखे तसेच मुंबई NSUI पदाधिकाऱ्यांनाही अटक केल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला.

वडेट्टीवार यांनी या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत विद्यार्थ्यांचे फोटो काढणे, त्यांना केसेसची धमकी देणे आणि बस ताब्यात घेणे हे लोकशाहीविरोधी असल्याचे म्हटले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधून पोलिसी कारवाई थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली.

हर्षवर्धन सपकाळ यांनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल करत, “अटक केलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची आणि NSUI पदाधिकाऱ्यांची तात्काळ सुटका करा; अन्यथा काँग्रेसचे सर्व नेते मुंबईत येऊन वर्षा बंगल्याला घेराव घालतील,” असा इशारा दिला. पुढे त्यांनी “अन्यथा वर्षा बंगल्यात घुसायलाही वेळ लागणार नाही” असा अधिक आक्रमक इशाराही दिला.

काँग्रेसच्या मुख्यालयात पोलिसांचा बेकायदा प्रवेश:हर्षवर्धन सपकाळ

नाशिकहून मुंबईकडे लाँग मार्च काढलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी रात्रीच्या मुक्कामासाठी काँग्रेसच्या टिळक भवन मुख्यालयात आश्रय घेतला होता. मात्र, मध्यरात्रीपासून पोलिसांनी विद्यार्थ्यांचा ससेमिरा सुरू केला आणि काँग्रेसच्या मुख्यालयात बेकायदा प्रवेश करून विद्यार्थीनींना धमकावले ताब्यात घेतले,पोलिसांनी NSUI अध्यक्ष सागर साळुंखे तसेच मुंबई NSUI अध्यक्षांना अटक केली आहे.“काँग्रेसच्या मुख्यालयात पोलिसांनी अशा बेकायदा पद्धतीने प्रवेश करून केलेली कारवाई दंडेलशाहीचे लक्षण आहे. अटक केलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची तसेच NSUI पदाधिकाऱ्यांची तात्काळ सुटका करावी,”“विद्यार्थ्यांची सुटका केली नाही, तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व नेते मुंबईत येऊन वर्षा बंगल्याला घेराव घालतील.

महिलांना मध्यरात्री, रात्री अटक करता येत नाही. हा अधिकार कोणी दिला? आणि एवढी हिंमत होते कशी? अतुल लोंढे (वरिष्ठ प्रवक्ते काँग्रेस)

देशातल्या हुकूमशाही सरकारनं आणि महाराष्ट्रातल्या हुकूमशाही सरकारनं सर्व कायदे आणि संविधान जे आहे ते ताकवर ठेवण्याचं सुरू केलेलं आहे.काल काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या मुख्यालयातून टिळक भवनातून मध्यरात्री महिलांना, म्हणजे विद्यार्थिनींना, मुलींना जबदस्ती अरेस्ट करून पोलीस घेऊन गेले.
महिलांना मध्यरात्री, रात्री अटक करता येत नाही. हा अधिकार कोणी दिला? आणि एवढी हिंमत होते कशी? ही आदिवासी मुलं आपल्या हक्काच्या मागण्यासाठी आझाद मैदानांकडे येत होती. रात्री ती विश्वासाने काँग्रेसच्या कार्यालयात थांबली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आदिवासी विद्यार्थ्यांना मध्यरात्री अडवून धमक्या; विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

‘पोलिसी दडपशाही थांबवा, मुख्यमंत्र्यांनी स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधावा’ मुंबई :...

ड्राय डेच्या दिवशी अवैध दारूविक्री; खडक पोलिसांकडून ४१ हजार ९१० रुपयांचा मद्यसाठा जप्त

घोरपडे पेठेत छापा; बलराम प्रताप परदेशी ताब्यात पुणे : महात्मा...

पद्मश्री जयमालाबाई शिलेदार स्मृती संगीत नाट्य प्रवेश स्पर्धा

शिवमंगल स्वरनाट्य संघ आणि शब्दनादला प्रथम क्रमांक पुणे : एकपात्री...

अक्षय उर्फ झुरळ्या पाटोळेच्या हत्येप्रकरणी अजय उर्फ ‘चोर राजा’ शिंदे जेरबंद

काशेवाडीतील घटनेने खळबळ; सराईत गुन्हेगाराच्या खुनाचा अवघ्या तीन तासांत...