विद्यार्थ्यांना अमानवीय परिस्थितीत राहण्यास भाग पाडलं’; दिल्लीतील इमारत दुर्घटनेवर राहुल गांधींचा आरोप

Date:

सत्य निकेतनमध्ये पाच मजली इमारत कोसळून दोघांचा मृत्यू; विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेवर राहुल गांधींचे सरकारला सवाल

नवी दिल्ली : दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात पाच मजली इमारत कोसळल्याच्या घटनेवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये पुरेशा वसतिगृह सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना अत्यंत अमानवीय परिस्थितीत ‘पेइंग गेस्ट’ म्हणून राहण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

सत्य निकेतन परिसरातील ही इमारत रविवारी दुपारी कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

एनडीआरएफ, दिल्ली अग्निशामक दल आणि पोलिसांकडून घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. बचावासाठी अग्निशामक दलाच्या किमान आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे. कोसळलेल्या इमारतीत विद्यार्थी पीजीमध्ये भाड्याने राहत होते.

‘प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व प्रयत्न करा’

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली. सत्य निकेतनमधील दुर्घटना अत्यंत दुःखद आणि चिंताजनक असल्याचे सांगत त्यांनी बचाव यंत्रणांना ढिगाऱ्याखाली अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचार मिळाले पाहिजेत आणि बचावकार्यात कोणतीही कसर राहू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

काँग्रेस आणि एनएसयूआयचे कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित राहून मदत करत असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. पीडित विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी काँग्रेस उभी असल्याचेही त्यांनी म्हटले.

‘एकाच छताखाली ४० विद्यार्थी राहत होते’

विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले की, विद्यार्थ्यांचे जीवन आधीच अनेक संघर्षांनी भरलेले आहे. त्यात सुरक्षित निवासाची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची परिस्थिती आणखी धोकादायक होत आहे.

महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये पुरेशा वसतिगृहांची व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पीजीमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. एकाच छताखाली तब्बल ४० जण राहत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

“प्रत्येक विद्यार्थ्याचे आयुष्य मौल्यवान आहे आणि कोणत्याही परिस्थितीत त्याचे रक्षण झाले पाहिजे,” अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली.

या दुर्घटनेनंतर दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या पीजी निवास व्यवस्थेची सुरक्षितता, इमारतींची संरचनात्मक तपासणी आणि विद्यापीठ परिसरातील वसतिगृहांची कमतरता हे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देशातील सर्वांत मोठ्या SBI बँकेने प्रभावित ग्राहकांना माहिती दिली कि नाही ? शेअर मार्केटला ५ दिवसांनी कळवले

३.७५ लाख नोंदींच्या कथित डेटासंचातून ३,८९७ ग्राहकांची वैयक्तिक माहिती...

केदारनाथमध्ये हिमवृष्टीने थंडीचा कडाका; केरळमध्ये दरड कोसळून एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले!

मध्य प्रदेशात मेघगर्जना, विजा आणि वादळी वाऱ्यांचा इशारा; उत्तराखंडच्या...

देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या १९१ पोलीस वीरांना पुण्यात मानवंदना; पोलीस स्मृतिदिनी शोक कवायत

पाषाण येथील पोलीस हुतात्मा स्मारकावर पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर...

विजयादशमी निमित्त पराक्रमी सेनाधिकारी सन्मान सोहळा

सैनिक मित्र परिवार, पुणे च्या वतीने आयोजन ; निवृत्त...