मुलींचे जन्मदाखले आता विनामूल्य-स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

Date:

पुणे : पुणे शहरात जन्मलेल्या मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी आणि समाजात स्त्री-सन्मानाची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने मुलींचे जन्मदाखले विनामूल्य देण्याचा प्रस्ताव पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती समोर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.हा प्रस्ताव सर्वपक्षीय नगरसेवकांची दिल्याचे भिमाले यांनी सांगितले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुणे शहरातून स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि महिलांच्या हक्कांसाठी ऐतिहासिक कार्य केले. त्यामुळे त्यांच्या कार्याचा वारसा जपणे ही पुणे महापालिकेची सामाजिक जबाबदारी आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभाव दूर करण्यासाठी मुलीच्या जन्माकडे आनंद आणि अभिमानाची बाब म्हणून पाहण्याची गरज असल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे.

मुलीच्या जन्मानंतर कुटुंबावर कोणताही अनावश्यक आर्थिक भार पडू नये तसेच संस्थात्मक पातळीवर तिच्या जन्माचा सन्मान व्हावा, यासाठी जन्म-मृत्यू नोंदणी विभागामार्फत मुलींचे जन्मदाखले कोणतेही शुल्क न आकारता देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली होती.

मुलीचा जन्म हा कुटुंबासह समाजासाठीही सन्मानाची आणि आनंदाची बाब आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्याचा प्रयत्न असल्याचे भिमाले म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

श्री महासरस्वती देवीला स्फटिक माळ, तर श्री महाकाली देवीला रुद्राक्ष माळ अर्पण

पुणे : सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात सुरू असलेल्या...

महिलांसाठी मोठी संधी! ICICI लाइफ इन्शुरन्स करणार २० हजार महिला विमा सल्लागारांची भरती

‘नारीशक्ती’ उपक्रमांतर्गत देशभरात संधी; कंपनीकडे आधीच ७८ हजारांहून अधिक...

बँक ऑफ बडोदाचा मुंबईत MSME उद्योजकांशी थेट संवाद; २०० हून अधिक व्यावसायिकांचा सहभाग

लघुउद्योगांना पतपुरवठा, खेळते भांडवल आणि डिजिटल बँकिंग सुविधांची माहिती;...

पीक पंचनामे गतीने पूर्ण करा; यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

चारा लागवड, ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि पाणीपुरवठा योजनांतील प्रलंबित कामे...