पुनर्विकासाच्या नावाखाली ही ऐतिहासिक वास्तू पाडण्याचा कोणाचाही विचार नाही-महापौर मंजुषा नागपुरे

Date:

पुणे – :सांस्कृतिक राजधानी असा नावलौकिक असलेल्या पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण आजपर्यंत निश्चित करण्यात आलेले नाही. ते करण्याचा आपला मानस असून त्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण कार्यात कलाकारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केले.

बालगंधर्व रंग मंदिराच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवार ट्रस्ट आणि पुणे महापालिकेच्या वतीने आयोजित ,अलविरा मोशन एंटरटेनमेंट प्रस्तुत करण्यात आलेल्या बालगंधर्व महोत्सवात महापौरांच्या हस्ते रात्री बारा वाजता केक कापून रंगमंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले, बालगंधर्व परिवार ट्रस्टचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपट महामंडळाचे कायदेशीर सल्लागार ॲड. मंदार जोशी, अलविरा मोशन एंटरटेनमेंट च्या दीपाली कांबळे,तृप्ती देसाई व अन्य मान्यवर उपस्थित होते.

बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासंबंधी देखील महापौरांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. बालगंधर्व रंगमंदिर ही कलाकार आणि कला रसिकांसाठी जिव्हाळ्याची ऐतिहासिक वास्तू आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली ही ऐतिहासिक वास्तू पाडण्याचा कोणाचाही विचार नाही. कलाकार आणि रसिक या दोघांच्या सोयीसाठी अधिक सुविधा निर्माण करणे हाच पुनर्विकासाचा मुख्य हेतू आहे. हे सर्व बदल कलाकारांचा सल्ला घेऊन, त्यांना विश्वासात घेऊनच करण्यात येतील. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यात येणार आहे अशी समजूत कोणीही करून घेऊ नये, असे महापौरांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या सर्व सांस्कृतिक सभागृहांची नोंदणी पारदर्शक रीतीने ऑनलाइन पद्धतीने करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. त्याचप्रमाणे बालगंधर्व महोत्सवासाठी वर्षातील तीन दिवस बालगंधर्व रंगमंदिराच्या तारखा कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात येतील, अशी खात्री देखील त्यांनी दिली.

रात्री बारा वाजता उपस्थित राहून बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनाचा केक कापणाऱ्या मंजुषा नागपुरे या पहिल्या महापौर ठरल्याचेही मेघराज राजेभोसले यांनी आवर्जून नमूद केले.

बालगंधर्व रंगमंदिराबाबत आस्था असणाऱ्या कलाकारांकडून सलग अठरा वर्ष बालगंधर्व महोत्सव स्वयंस्फूर्तीने साजरा केला जात आहे. या निमित्ताने कला रसिकांसाठी संगीत रजनी, लावणीसारखे लोककलेचे प्रकार, एकपात्री प्रयोग, जादूचे प्रयोग, कलाविषयक व्याख्याने, परिसंवाद असे कार्यक्रम मोफत सादर केले जातात. मात्र, बालगंधर्व महोत्सवाच्या वेळी अनेकदा बालगंधर्व रंगमंदिरांच्या तारखांची अडचण निर्माण होते. त्यामुळे वर्धापन दिनाला जोडून तीन दिवसांच्या तारखा या महोत्सवासाठी राखीव ठेवाव्या, अशी मागणी मेघराज राजेभोसले यांनी यावेळी महापौरांकडे केली. त्याचप्रमाणे कलाकार पदरमोड करून आयोजित करत असलेल्या या महोत्सवाला महापालिकेकडून निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी देखील त्यांनी केली. तसेच बालगंधर्व रंग मंदिराचा पुनर्विकास करताना मूळ वास्तू न पाडता पुनर्विकासाचा प्रयत्न करावा आणि त्यामध्ये कलाकारांना विश्वासात घेतले जावे, अशी मागणीही भोसले यांनी कलाकारांच्या वतीने केली. यापैकी बहुतेक मागण्या महापौरांनी तात्काळ मान्य केल्या.

बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनाच्या पुर्व संध्येला रात्री बारा वाजता उपस्थित राहून मा. महापौर यांनी कलाकार स्त्री शक्तीला वंदन केले आहे आणि ही पुणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन चित्रपट महामंडळाचे कायदेशीर सल्लागार ॲड मंदार जोशी यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग चौधरी यांनी, तर आभार प्रदर्शन अनिल गुंजाळ यांनी केले.

केवळ आश्वासने देत नाही म्हणूनच…

या कार्यक्रमात मेघराज राजेभोसले यांनी कलाकारांच्या वतीने केलेल्या बहुतेक मागण्या महापौरांनी तात्काळ मान्य केल्या. मात्र, बालगंधर्व महोत्सवाला निधी देण्याच्या बाबतीत त्यांनी मौन बाळगणे पसंत केले. अर्थातच, उपस्थित आणि महापौर नागपुरे यांना या मागणीची आठवण करून दिली. किमान आश्वासन तरी द्या, असे उपस्थितांकडून सुचविण्यात आले. यावेळी, मी राजकारणी असले तरीही केवळ पोकळ आश्वासने देत नाही. कदाचित त्यामुळेच मी बिनविरोध निवडून येऊन महापौर पदावर विराजमान झाले आहे, अशी स्पष्टोक्ती नागपुरे यांनी केली. बालगंधर्व महोत्सवाला निधी देण्याबाबत योग्य माहिती घेऊन त्याबाबत निश्चितपणे कार्यवाही केली जाईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात रॅपिडोविरोधात गुन्हा दाखल; विनापरवाना बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी परिवहन विभागाची कारवाई!

विश्रांतवाडी परिसरात दुचाकी जप्त; ‘रिक्षाचालकांच्या कायदेशीर लढ्याला यश’ —...

श्री महालक्ष्मी मंदिराच्या चित्रकला स्पर्धेत आराध्य लांडे, सई लांडगे प्रथम

हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग; एक लाख सहा हजार रुपयांची पारितोषिके पुणे...

आकाशात भरारी घेणाऱ्या महिला वैमानिकांचा सन्मान

नवरात्रीत श्री महालक्ष्मी ट्रस्टच्या वतीने स्त्रीशक्तीचा जागर पुणे : आकाशात...

आयडीबीआय बँकेची विक्री बेकायदेशीर; केंद्र सरकारचा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक – विश्वास उटगी

*नफ्यातील राष्ट्रीयीकृत बँक विदेशी कंपनीला विकण्याचा घाट; आत्मनिर्भरतेचे खच्चीकरण...