पालखी मार्ग अनधिकृत होर्डिंग्ज मुक्त; ७० अनधिकृत होर्डिंग्जवर हातोडा!

Date:

  • ‘पीएमआरडीए’ची धडक कारवाई; अनधिकृत होर्डिंग्जविरोधातील कारवाईसत्र सुरूच राहणार!

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या जुलै महिन्यातील आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मोठी धडक कारवाई केली आहे. ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील पालखी मार्ग आता अनधिकृत होर्डिंग्जपासून पूर्णपणे मुक्त करण्यात येत असून, आतापर्यंत ७० अनधिकृत होर्डिंग्जवर अनधिकृत बांधकाम विभागाने हातोडा चालवून ती भुईसपाट केली आहेत.
पालखी सोहळा निर्विघ्न पार पडावा, आणि वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा, या उद्देशाने ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी मे महिन्यातच या मार्गांवरील होर्डिंग्जचे सर्वेक्षण करून अनधिकृत होर्डिंग्ज निष्कासित करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. या आदेशानुसार अनधिकृत बांधकाम विभागाने ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील हवेली, दौंड आणि पुरंदर तालुक्यांतील पालखी मार्गांवरील सुमारे १२३ होर्डिंग्जचे सविस्तर सर्वेक्षण केले.
या सर्वेक्षणानंतर कायदेशीर बाबींची पूर्तता न करता बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेली तब्बल ७० अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्यात आल्याची माहिती अनधिकृत बांधकाम विभागाचे सहआयुक्त हिंमत खराडे यांनी दिली. यामध्ये हवेली-सोलापूर रस्त्यावरील ३२, दौंड तालुक्यातील १३, पुरंदर तालुक्यातील १३ आणि वडकी येथील १२ अशा एकूण ७० अनधिकृत होर्डिंग्जवर प्रशासनाने थेट हातोडा चालवून ती भुईसपाट केली आहेत. तसेच, काही अनधिकृत होर्डिंगधारकांनी आपली होर्डिंग्ज स्वतःहून काढून घेतली आहेत.
केवळ मुख्य पालखी मार्गच नव्हे, तर ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील पुणे जिल्ह्यातील इतर प्रमुख मार्गांवरील आणि मोक्याच्या ठिकाणांवरील होर्डिंग्जचेही सर्वेक्षण सध्या वेगाने सुरू आहे. या सर्वेक्षणात अनधिकृत अथवा विनापरवाना उभारलेली होर्डिंग्ज आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहआयुक्त हिंमत खराडे यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे संबंधित व्यावसायिक आणि जाहिरातदारांनी ‘पीएमआरडीए’ची रीतसर परवानगी घेऊनच होर्डिंग्ज उभारावीत; अन्यथा प्रशासनाकडून थेट निष्कासनाची कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशाराही ‘पीएमआरडीए’ प्रशासनाने दिला आहे.

“‘पीएमआरडीए’च्या हद्दीत कुठेही होर्डिंग्ज उभारताना प्रशासनाची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. नियमबाह्य आणि विनापरवाना उभारलेल्या होर्डिंग्जवर कोणतीही गय न करता थेट निष्कासनाची कारवाई केली जाईल.”
— डॉ. अभिजित चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....

वाढदिवस,लग्न समारंभ, सण व कौटुंबिक आनंदाचे क्षण साजरे करताना सामाजिक भान महत्त्वाचे – संदीप खर्डेकर.

क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे "अब नॉर्मल" दिव्यांग केंद्राला आवश्यक साहित्य...

देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी लढाई, संविधान रक्षणाच्या लढाईत अनुसुचित जातीची भूमिका महत्वाची: हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे नवनियुक्त चेअरमन अनिरुद्ध वनकर यांचा...