“आमच्या उज्वल भवितव्यासाठी व राज्याच्या प्रगतीसाठी मतदान करा” पत्रातून विद्यार्थीनींचे पालक आणि नातेवाईकांना साकडे

Date:

पुणे, दि. 14 : “आमच्या उज्वल भवितव्यासाठी व राज्याच्या प्रगतीसाठी मतदान करा”, असे साकडे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मॉडर्न विद्यालयातील विद्यार्थिनींनी भ्रमणध्वनी संदेशाचे माध्यम वापरण्याऐवजी पत्र पाठवून आपल्या पालकांना व नातेवाईकांना घातले आहे.

मतदानाचा टक्का वाढावा म्हणून भारत निवडणूक आयोग, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय व स्विप व्यवस्थापन कक्ष यांच्यावतीने शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. शिवाजीनगर येथील मॉडर्न मुलींचे विद्यालय या शाळेतील विद्यार्थिनींनी पालक आणि नातेवाईकांना पत्र लिहीले आहे. निवडणुकीपूर्वीच ते त्यांच्या हातात मिळेल. “आमच्या उज्वल भवितव्यासाठी व राज्याच्या प्रगतीसाठी मतदान करा”. असे आवाहन या पत्रातून करण्यात आले आहे.

या उपक्रमात 300 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. शालेय अभ्यासक्रमामध्ये पत्रलेखन हा विषय आहे. मात्र भ्रमणध्वनीच्या या जमान्यात पत्रलेखन करून आपल्या नातेवाईकांशी हितगुज करणे दुरापस्त झाले असतांना पत्रलेखन करण्याचा अनुभव घेत आपल्या नातलगांना विद्यार्थीनींनी पत्र लिहीले आहे. मतदानापूर्वी त्यांच्या नातेवाईकांच्या हातात हे टपाल खात्याचे पत्र पोहोचेल, ते सुद्धा याचा सुखद अनुभव घेतील, अशा बेताने हे पत्र टपालाद्वारे पाठविले जाणार आहे. या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ स्वीप समन्वय समितीचे दीपक कदम, सागर काशीद, विशाल म्हेत्रे, शाळेच्या मुख्याध्यापिका माया नाईक, डॉ. उज्ज्वला हातागळे, वैशाली घोडके, अनुप्रिती गाजरे, माधवी चिटणीस, जान्हवी दुर्गे, रेश्मा आदमाने, अश्विनी चेन्नूर, श्रुती साठे यांनी या उपक्रमाचे नियोजन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वंदे भारत स्लीपरसाठी रेल्वेचा ८३९ कोटींचा करार; अमेरिकेच्या वॅबटेक कंपनीला मोठी ऑर्डर!

५० वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी ब्रेक, स्वयंचलित दरवाजे आणि...

पुण्यात भाजपच्या निवडणूक व्यवस्थापनावर प्रश्न ; रणनीतीचा आढावा होणार?

पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत भाजपने संघटनात्मक...

नागपूर-पुण्यात भाजपला जोरदार धक्का! विधान परिषदेच्या पाच जागांपैकी तीन महाविकास आघाडीच्या ताब्यात

फडणवीस-गडकरींच्या नागपुरात काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी; पुणे पदवीधरमध्ये शरद...