पुण्यात वाघाची कातडी विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश:5 कोटींची कातडी जप्त, 6 जण ताब्यात

Date:

सीमा शुल्क विभागाची कारवाई–शिकार झालेल्या वन गाईला विष देण्यात आलं ती गाई वाघाने खाल्ली आणि वाघाला मारण्यात आलं
पुणे
:वाघांची शिकार करून त्यांची कातडी विकणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पुणे कस्टम विभागाने या प्रकरणी सोमवारी 6 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कातडीची आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 5 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.


वाघाची कातडी विकणारी एक टोळी जळगावजवळ आल्याची माहिती नागपूर सीमा शुल्क विभागाने पुणे सीमा शुल्क विभागाला दिली होती. त्यानुसार पुणे पोलिसांचे एक पथक 26 तारखेला त्याचा तपास करण्यासाठी पुण्याहून निघाले होते. त्यांनी सोमवारी या प्रकरणी कारवाई करत 6 जणांना ताब्यात घेतले. आरोपींत 2 महिलांचाही समावेश आहे. रहीम रफिक या टोळीचा म्होरक्या असल्याची माहिती आहे. त्याला यापूर्वीही तस्करीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
जप्त करण्यात आलेल्या कातडींत एका 5 फूट वाघिणीच्या कातड्याचा समावेश आहे. ही वाघीण 4 ते 5 वर्षांची असावी असा अंदाज आहे. तस्करामंनी एका वनगाईला विष देऊन ठार मारले. त्यानंतर ही गाय या वाघाच्या तोंडी देऊन त्यालाही ठार मारले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सीमा शुल्क विभागाने या प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी या प्रकरणी मोहम्मद आशर खान नामक आरोपीलाही अटक केली आहे. तो मूळचा भोपाळचा रहिवासी आहे. त्यामुळे जळगावात सापडलेल्या या प्रकरणाचा भोपाळ आणि त्यापुढे आंतरराष्ट्रीय पातळीवरील तस्करीशी काही संबंध आहे का? याचा धुंडाळा तपास अधिकारी घेत आहेत. पुणे सीमा शुल्क विभागाचे अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसदीय कारकिर्दीच्या शताब्दीनिमित्त पुणे महापालिका राबवणार विशेष उपक्रम

व्याख्यानमाला, परिसंवाद, प्रदर्शनांसह वर्षभर विविध कार्यक्रम; एक कोटी रुपयांच्या...

महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यभरात विविध उपक्रम

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची माहिती​​मुंबई दि.०६ :- सत्यशोधक...

पुण्यात २०१७ पासून किती झाडे तोडली आणि किती जगली? संपूर्ण हिशेब द्या! — मनसेचे साईनाथ बाबर

वृक्षतोड, पुनर्रोपण आणि भरपाई वृक्षलागवडीचे स्वतंत्र लेखापरीक्षण करा; कंत्राटदारांवरील...