सुबकची नवी नाट्यकृती ‘अमर फोटो स्टुडीओ’

Date:

 

index index2

‘मस्ती नाय तर दोस्ती नाय’ असे म्हणत अल्पावधीत तरुणाईची मन जिंकणाऱ्या दिल दोस्ती दुनियादारीचे लोकप्रिय कलाकार ‘सुबक’ निर्मित, ‘कलाकारखाना’ प्रस्तुत ‘अमर फोटो स्टुडीओ’ या नव्या नाट्यकृतीतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अमेय, सुव्रत, सखी या तिघांनी मिळून  आणलेल्या कलाकारखाना या संस्थेतर्फे सध्या फेसबुक यासारख्या सोशल नेट्वर्किंग साइटवर अमर फोटो स्टुडीओ ही अॅक्टीव्हीटी जोशात सुरु असून सिनेवर्तुळातील सर्वच #‎amarphotostudio ला कनेक्ट होत आपला बालपणीचा फोटो अपलोड करून खूप प्रतिसाद देताहेत.

 अभिनेता सुनील बर्वे यांनी चार वर्षांपूर्वी ‘हर्बेरिअम’ हा आगळावेगळा उपक्रम सुरु केला. अभिनेता सुनील बर्वे यांच्या ‘सुबक’ची निर्मिती असलेल्या या उपक्रमाला नाटय रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यात ‘सुर्याची पिल्ले’, ‘लहानपण देगा देवा’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘आंधळं दळंतय’ व ‘झोपी गेलेला जागा झाला’ या पाच जुन्या गाजलेल्या नाटकांचे नव्या संचात सादरीकरण करून नाटय रसिकांना एक अनोखी पर्वणी दिली. आता याच शिदोरीवर ‘सुबक’ची अमर फोटो स्टुडीओ ही नवीकोरी हटके कलाकृती घेऊन सुनील बर्वे सज्ज झाले आहेत. अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, पूजा ठोंबरे, सिद्धेश पूरकर ही लोकप्रिय कलाकार मंडळी यात एकत्र आली आहेत. मनस्विनी लता रवींद्र यांचे लेखन असणाऱ्या ‘अमर फोटो स्टुडीओ’ या नाटकाचे दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी करीत आहेत.
 या नाटकाचा विषय अजून गुलदस्त्यात असून रसिक प्रेक्षकांसाठी नक्कीच ती एक अफलातून ट्रीट असणार आहे. चेतन डांगे लिखित यातील गीतांना गंधार संगोराम यांचे पार्श्वसंगीत असणार आहे. या नाटकाची संकल्पना घेऊन अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले हे कलाकार सुनील बर्वे यांच्या कडे गेले त्यांनाही हा विषय आवडला आणि तरुणाईला प्रोत्साहन द्यावं या निर्मळ हेतूने सुनील बर्वे यांनी या कलाकृतीला पाठिंबा दिल्याचे मनोगत व्यक्त केले. ‘हर्बेरिअम’ हा उपक्रम पुढे करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ‘अमर फोटो स्टुडीओ’ नाटकाच्या तालमी सध्या जोरात सुरु असून लवकरच ते प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मदत नको, संधी द्या’ या विचारातून जय गणेश व्यासपीठ व गणेश मंडळांचा स्तुत्य उपक्रम

पुणे : नवरात्रोत्सवात स्त्रीशक्तीचा जागर होत असताना, केवळ मदतीचा...

‘देशाच्या राजधानीत आपलाच तिरंगा हातात धरणे गुन्हा असेल, तर मला तुरुंगात टाका!’ — अभिजीत दीपके

एकटे चालत असतानाही पोलिसांनी रोखल्याचा CJPचा आरोप; कनॉट प्लेसमधील...

पोलीस क्षेत्रात महिला पोलिसांचे कर्तृत्व पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे 

पोलीस सह आयुक्त संजय दराडे ; श्री महालक्ष्मी मंदिरात...