‘झी टॉकीज कॉमेडी अॅवॉर्डस’चा जल्लोष ‘मर्डर मेस्त्री’ व ‘श्री बाई समर्थ’ची बाजी

Date:

9 8 7

6 4

3 2 1

 

विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणा-या कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे ‘झी टॉकीज कॉमेडी अॅवॉर्डस’. दरवर्षी मोठ्या थाटात साजरा होण्याची आपली परंपरा कायम राखत याहीवर्षी अतिशय रंगतदार पद्धतीने हा सोहळा रवींद्र नाट्यमंदिरात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न  झाला. यावर्षी ‘कल आज और कल’… अशी हटके थीम घेऊन हा सोहळा रंगला.

यावर्षीचा सर्वोत्कृष्ट विनोदी चित्रपटाच्या बहुमानासह मर्डर मेस्त्री चित्रपटाने व श्री बाई समर्थ या नाटकाने पुरस्कार सोहळ्यावर आपली ठसठशीत मोहोर उमटवली. तर  चित्रपट विभागात प्रशांत दामले यांनी सर्वोत्कृष्ट नायकाचा आणि क्रांती रेडकर व मानसी नाईक यांनी सर्वोत्कृष्ट नायिकेचा मान मिळवला. नाटक विभागात अभिजीत चव्हाण व निर्मिती सावंत यांनी बाजी मारली. तसेच पुनरुज्जीवित नाटक विभागात संशयकल्लोळ नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार मिळाला. याच विभागासाठी अभिनेता प्रशांत दामले (संशयकल्लोळ) व अभिनेत्री  हेमांगी कवी (ती फुलराणी) यांनी पुरस्कार पटकावले. पाच दशकाहून अधिक काळ मराठी रंगभूमीची सेवा करणारे ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांना या सोहळ्यात प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. लोकनाट्याचा विशेष पुरस्कार कोकणातील ज्येष्ठ दशावतारी कलावंत महादेव चोडणेकर यांना देण्यात आला. अभिनेते अरुण नलावडे यांना विशेष ज्युरी पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रत्येक पुरस्कारागणिक वाढत जाणारी उत्कंठा,  सादर होणारे एकापेक्षा एक बहारदार कलाविष्कार आणि त्याला मिळणारी  प्रेक्षकांची उत्स्फुर्त दाद यामुळे ‘झी टॉकीज कॉमेडी अॅवॉर्डस’चा नेत्रदीपक सोहळा रंगतदार झाला.

विजेते

चित्रपट विभाग

सर्वोत्कृष्ट चित्रपट –  ‘मर्डर मेस्त्री’

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – राहुल जाधव (मर्डर मेस्त्री)

सर्वोत्कृष्ट लेखन –  नेहा कामत, प्रशांत लोके (मर्डर मेस्त्री) 

सर्वोत्कृष्ट अभिनेता – प्रशांत दामले(भो भो)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री– क्रांती रेडकर(मर्डर मेस्त्री), मानसी नाईक ( कॅरी ऑन देशपांडे)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सिद्धार्थ मेनन(पोस्टर गर्ल),

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री-  मैथिली वारंग (वॅान्टेड बायको नंबर १)

 

नाटक विभाग

सर्वोत्कृष्ट नाटक – ‘श्री बाई समर्थ’

’सर्वोत्कृष्ट संहिता – ‘कुछ मिठा हो जाये’( शिरीष लाटकर, गणेश पंडित, आशिष पाथरे, अभिजीत गुरु)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – राजेश देशपांडे (श्री बाई समर्थ)

सर्वोत्कृष्ट अभिनेता – सिद्धार्थ जाधव (गेला उडत)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – निर्मिती सावंत (श्री बाई समर्थ)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – अभिजीत चव्हाण (कुछ मिठा हो जाये )

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- वनिता खरात (श्री बाई समर्थ 

सर्वोत्कृष्ट पुनरुज्जीवित नाटक – संशयकल्लोळ

सर्वोत्कृष्ट अभिनेता – प्रशांत दामले (संशयकल्लोळ)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – हेमांगी कवी ( ती फुलराणी)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – संतोष पवार (तुम्हीच माझे बाजीराव)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पेट्रोलची जुनी गाडी इलेक्ट्रिक करून देण्याचे दावे किती खरे? लाखो रुपये खर्च करण्यापूर्वी सावधान!

पेट्रोल गाडीचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर कायदेशीर; मात्र प्रमाणित किट, अधिकृत...

सोन्याच्या दरात २५ हजारांची घसरण होणार? ग्राहकांनी खरेदीसाठी थांबावे की आताच सोने घ्यावे?

प्रति १० ग्रॅम दर ₹१.२५ लाखांपर्यंत घसरण्याची बाजारात चर्चा;...

विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

_१८२ उमेदवार निवडणूक रिंगणात _२ हजार ४१९ मतदान केंद्रांवर १०...

५० टक्के शेतकऱ्यांचा विरोध असल्यास टीपी स्कीम रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे!

शेतकऱ्यांवर नगररचना योजना लादणार नाही; PMRDA आयुक्त डॉ. अभिजीत...