महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे वाढतोय शहरात कोरोना- आबा बागुल

Date:

पुणे- शहरातील नायडू हॉस्पिटलमध्ये स्टाफ कमी असल्याने कोरोना झालेल्या रुग्णांनाच्या नातेवाईकांना बेड शेजारी बसवले जाते त्यांची काळजी घेण्यास सांगितले जाते. ही बाब खूप चिंताजनक असून महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे शहरात कोरोना बळावतो आहे असा आरोप पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी सत्ताधारी भाजप व प्रशासनाला विचारला.

ते म्हणाले की, कोरोना संसर्गजन्य आजार असून त्यापासून इतरांना लागण होते.आधीच पुणे शहरात कोरोनाने थैमान घातले असून ते कमी कसे करायचे याकडे लक्ष देणे गरजेचे असताना महानगरपालिकेच्या नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोना झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना बेड शेजारी बसवून त्यांची काळजी घेण्यास सांगितले जाते, सर्रास नातेवाईक रुग्णांजवळ बसतात, उरीनल व इतर सर्व सफाई नातेवाईकांना करायला लावतात ही अतिशय गंभीर बाब असून नातेवाईक याबाबत तक्रार करत आहेत. सत्ताधारी भाजप नुसतेच निविदेच्या मागे लागले असून हॉस्पिटलमध्ये पाहणीसाठी जातात त्यावेळी त्यांना हे दिसत नाही का? का दिसून देखील दुर्लक्ष करत आहेत. ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी नाही का?  यामुळे पुणे शहरात कोरोना वाढेल याची सत्ताधारी भाजपला काळजी नाही. त्यांच्या निष्काळजीपणामुळे नाहक पुणेकरांनी त्रास का सहन करायचा. महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ही अवस्था असेल तर खासगी हॉस्पिटलमध्ये काय असेल. याबाबत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन दिले असून ही परिस्थिती बदलावी नवीन स्टाफ भरती करावी व जातीने लक्ष घालावे अशी मागणी आबा बागुल यांनी केली. व नागरिकांनी असे प्रकार होत असल्यास आमच्याशी व प्रशासनाशी संपर्क साधण्याचे  आवाहन आबा बागुल यांनी  केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘पीएमआरडीए’ मुख्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण पुणे :...

जिल्ह्यात पहिल्याच दिवशी आठ हजाराहून अधिक नागरिकांनी केली स्व-गणना-अपर जिल्हाधिकाऱ्‍यांची माहिती

जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश...

डॉ. सुरेश गरसोळे यांनी नकाश्याला आधुनिक तंत्रज्ञाना ची जोड द्यावी – दीपक शिकारपूर.

महाराष्ट्र दिनी नवीन जिल्हे व अहिल्यानगर, संभाजीनगर, धाराशिव ह्या...

सामाजिक न्यायासाठी आग्रही हीच समाजवादी चळवळीची ओळख:अॅड.मोहन वाडेकर        

नानासाहेब गोरे स्मृती दिनानिमित्त अभिवादन सभेला चांगला प्रतिसाद पुणे :एस....