वाचा काय आहे आहे कथा आणि काय आहे व्यथा ..
पुणे- पुणे तिथे काय उणे म्हणतात ते काही खोटे नाही .विश्वास बसणार नाही आणि खरे वाटणार नाही पण हि सत्य स्थिती आहे पुण्याच्या एकाच बंगल्यात चक्क ३५० कुत्री आणि असंख्य म्हणजे ७० हून अधिक मांजरे असल्याची धक्कादायक माहिती आज उजेडात आली आहे .महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल आणि महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याशी यासंदर्भात ‘मायमराठी’ ने संपर्क साधला . पहा ते काय म्हणाले ….
पण साधी सरळ वाटेल अशी कथा काही उजेडात आली नसली तरी … तिचे काही कंगोरे मात्र स्पष्ट झाले आहेत . अतिरिक्त आयुक्त थोड्या नाराज झाल्या. पण २०१७ साली या प्रकरणावर उच्च न्यायालयातून स्थगिती मिळाल्याचे समजते मग महापालिकेला येथील कुत्र्यांच्या संख्येबाबत ,अथवा अन्य माहिती अधिकृतपणे का सांगता येऊ नये हा खरा प्रश्न होता. मिळालेल्या माहितीनुसार हि कथा नाही तर व्यथा आम्ही इथे मांडतो आहे. अर्थात त्यात किती तथ्य आणि किती असत्य हे मात्र महापालिका प्रशासनालाच स्पष्ट करावे लागणार आहे. पुणे महापालिका हद्दीत अगदी गजबजलेल्या वस्तीत असलेल्या एका बंगल्यात राहणरी एक महिला चक्क ३५० कुत्री बाळगून असल्याची माहिती मिळाल्यावर याबाबत माहिती घेतली असता , असे समजले कि हि महिला आणि तिचे सहकारी डॉक्टर आणि काही मंडळी यांनी रस्त्यावर जखमी होणारी, आजारी पडून खंगत जाणारी कुत्री येथे आणून किंवा स्वीकारून त्यांच्यावर उपचार करण्याचे काम सुरु ठेवलेले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने त्यांच्या घरात असे प्राणी असल्याने आजूबाजूच्या परिसरातील रहिवाश्यांना मात्र त्रासाचा सामना वारंवार करावा लागतो आहे. या रहिवाश्यांनी महापालिका ,पोलीस आणि अॅनिमल वेल्फेअर बोर्ड यांच्याकडे गार्हाणी केली आहेत . विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी महापालिकेने यांच्या कार्यासाठी जागा देण्याचा प्रयत्न देखील केला . पण त्यात अनंत विघ्ने आली . अखेरीस आजूबाजूच्या नागरिकांच्या तक्रारींना कंटाळून महापालिकेने २०१७ मध्ये या ठिकाणी कारवाई करण्याचा यत्न केला . त्यावेळी संबधित महिला आणि त्यांची संस्था मिशन पोसीबल यांनी न्यायालयात धाव घेतली आणि महापालिकेच्या कारवाई वर स्थगिती मिळविली .विशेष म्हणजे २०१७ पासून हि स्थगिती तशाच अवस्थेत धूळ खात पडली. महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले. संस्थेचे मुक्या प्राण्यांवर उपचार करण्याचे काम सुरूच राहिले. पण आजूबाजूच्या रहिवाश्यांना मात्र त्रासातून मुक्तता मिळणे दुरापास्त झाले.याविषयी ना रहिवाशी खुलेपणाने मिडिया च्या पुढे येतात . ना महापालिका अधिकारी व्यवस्थित माहिती सांगतात . अशा स्थितीत या बंगल्यात आजारी , मुकी जनावरे उपचार घेतच आहेत असे सांगण्यात येते आहे . आणि मायमराठी ला अद्याप तिथे प्रवेश मिळाला नाही . एका स्थानिक नगरसेवकाच्या वरदहस्ताने येथे हे सारे घडत असावे असे स्पष्ट चित्र आहे.