139 ऑक्सिजन एक्स्प्रेसनी केला देशभरात 8700 मेट्रीक टनाहून जास्त द्रवरुप ऑक्सिजन वितरीत

Date:

नवी दिल्ली -सर्व अडचणींवर मात करत आणि नवे पर्याय शोधत भारतीय रेल्वे देशभरातील राज्यांना द्रवरूप प्राणवायूच्या पुरवठ्याची मदत पोचवत आहे. आतापर्यंत भारतीय रेल्वेने देशभरातील विविध राज्यांना जवळपास 8700 मेट्रीक टन द्रवरुप प्राणवायू 540 पेक्षा जास्त टँकर्स मधून वितरीत केला आहे.

नोंदवण्याजोगी बाब अशी की आतापर्यंत 139  ऑक्सिजन एक्स्प्रेसनी  विविध राज्यांना मदत पोचवण्यासाठी प्रवास केला आहे.

हे वृत्त  प्रसिद्ध होईपर्यंत 35 टँकर्समधून 475 मेट्रीक टन द्रवरूप प्राणवायू घेऊन 6 ऑक्सिजन एक्स्प्रेस धावत आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये दर दिवशी  ऑक्सिजन एक्स्प्रेस देशाला जवळपास 800 मेट्रीक टन प्राणवायू पोचवत आहे.

आंध्रप्रदेशासाठी पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस नेल्लोर येथे 40 मेट्रीक टन द्रवरूप प्राणवायू घेऊन पोचली.

अजून एक ऑक्सिजन एक्स्प्रेस केरळच्या दिशेने त्या भागासाठी  118 मेट्रीक टन द्रवरूप प्राणवायू घेऊन प्रवास करत आहे.

हे वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत महाराष्ट्रात 521 मेट्रीक टन, उत्तरप्रदेशात जवळपास 2350 मेट्रीक टन, मध्यप्रदेशात 430 मेट्रीक टन, हरयाणात 1228 मेट्रीक टन, तेलंगणात 308 मेट्रीक टन, राजस्थानात 40 मेट्रीक टन, कर्नाटकात 361 मेट्रीक टन, उत्तराखंडात 200 मेट्रीक टन, तामिळनाडूत 111 मेट्रीक टन, आंध्र प्रदेशात 40 मेट्रीक टन तर दिल्लीत 3084 मेट्रीक टनाहून अधिक प्राणवायू उतरवण्यात आला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे-वाराणसी ‘अमृत भारत’ एक्सप्रेसला मंजुरी; पुणे-जबलपूर रेल्वेही होणार नियमित

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यशपुणे-जबलपूर...

सभासद संस्थेसोबत निष्ठेने असले तर कितीही अडचणी आल्या तरी संस्था संपत नाही

सहकारी संस्था कार्यकर्ता चर्चासत्रादरम्यान मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचे प्रतिपादनसातारा -...

खासदार पुण्याचे की, जबलपूरचे? माजी आमदार मोहन जोशी यांचा सवाल

पुणे : महाराष्ट्राच्या अंतर्गत रेल्वे गाड्या वाढवाव्यात, अशा मागणीकडे...