श्री. बालाजी सोशल ग्रुपच्यावतीने स्व. विजयालक्ष्मी जर्नादन श्रीगिरी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला . पुणे कॅम्प मधील बाबाजान चौकाजवळ राजेश्वर तरुण मंडळाच्या आवारात झालेल्या कार्यक्रमास सर्व धर्माचे धर्मगुरू यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे पूजन करून रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पार पडला . यामध्ये फादर अंन्टनी , हरिद्वार मिश्रा , भन्ते असांग , मौलाना यासीर मोहम्मद , हरप्रित सिंग या धर्म गुरूंच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले . यावेळी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा डॉ. किरण मंत्री , नगरसेविका प्रियांका राजेश श्रीगिरी ,नगरसेवक विवेक यादव , राजेश श्रीगिरी , शशिधर पूरम , विनायक काटकर , देवेंद्र भाटीया , राजू मेहता , अनिल पवार , संजय सोनवणे , किशोर संघवी , राहुल गावडे , जितेंद्र म्हस्के , नरेश पडियार , शंकर सुर्वे , संजय लचके , आनंद श्रीगिरी , आरपन बुंदेला , जनसेवा सहकारी बँकेचे संचालक सचिन यादव , निरंजन शेट्टी , लक्ष्मीकांत त्रिवेदी , चरण राचलवार , केशव पवार , प्रविण श्रीमान , शाम श्रीमान आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या रुग्णवाहिकेच्या संपर्क क्रंमाक – ०२० – २६३५२९९९ असा असून , २४ तास हि रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहे . अशी माहिती श्री. बालाजी सोशल ग्रुपचे अध्यक्ष राजेश श्रीगिरी यांनी दिली .