‘ स्मार्ट पुणे ‘ म्हणजे काय रे भाऊ?

Date:


पुणे-

शहरे स्मार्ट करायला कोण का विरोध करेल भाऊ? कोणाला वाटेल आपले शहर स्मार्ट नसावे ? आणि आमचे पुणे होते किती सुंदर … सगळीकडे रस्तोरस्ती होती झाडे … हवेशीर पुणे .. पेन्शरांचेपुणे -सायकलीचे  पुणे .. विसरलोत कुठे आम्ही ..ना विसरलो खंडाळ्याचा घाट.. आणि त्यातील हवा थंडगार … ना विसरलो कोतवाल चावडी … ना विसरलो वाड्यावाड्यात पोहोचणारे चवदार थंड पाणी … पण आता जमाना बदलला तसे नको का आम्हाला बदलायला … आता जो तो आपल्या गावात- राज्यात  पोटापाण्याच्या समस्येने त्रस्त झाला म्हणून धावतोय पुण्याकडे … बापरे बाप इथला सारा प्रकारच बदलला इथली सदाशिव पेठ दूर पळाली… टांगे – सायकली नाहीस्या झाल्या .. बरे बसचा कारभार डोईजड म्हणून दुचाक्या लोकांनी पत्करल्या . दुचाकी असेल तरच नौकरी होती आणि आहे कि भाऊ… वाढ वाढ शहरे वाढली … अजगर नाही वाढत , बकासुर नाही वाढणार , कुंभकर्ण नाही एवढा झोपणार … एवढी शहरे बकाल झाली .. आमच्या पुण्याचं रुपडं हरवलं . वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी स्काय बस .. बी आर टी , पीएमपीएमएल.. खूप धावल्या … आता म्हणे मेट्रो येणार … ऐकावे ते नवलच .. शिवाजी नगर हून स्वारगेट पर्यंत ती अंडर ग्राऊंड पद्धतीने येणार म्हणे … काय काय नवनवीन तंत्र आले , येईल भाऊ.. भुयारातून मेट्रो पुण्यात येईल … जशी बीआरटी आली आणि नाहीसी झाली तशी होवू नये म्हणजे झाले … आता पुणे स्मार्ट करणार म्हणे काय करणार ? १२०० कोटी तर मेट्रोच्या पहील्या टप्प्याला जाणार .. अर्थात तिचा स्मार्ट पुण्याशी संबध नसेल ? हो ना  रे भाऊ? मग करणार काय? वाहतुकीचा प्रश्न मेट्रोने सुटेल .आणखी … ? पिण्याच्या पाण्याचे खूप हाल आहेत भाऊ सध्या .. शहरात प्रत्येक ऑफिसात पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे – येते कधी..  आणि जाते कधी..कळतच नाही . त्यामुळे आम्ही घरूनच पाणी नेतो . ते ही आमच्या सौ . घरी पिण्याचे पाणी जेव्हा कधी येईल त्यासाठी सर्वात प्रथम  तत्पर असतात म्हणून . शहर जर स्मार्ट झाले तर सगळी कडे २४ तास प्यायला पाणी मिळेल कारे भाऊ? आणि हो आमचे एक महत्वाचे दुखणे आहे … कुठ्ठे भाऊ लघुशंकेला जागाच नाही मिळत . सगळीकडे लोक ये जा करीत असतात त्याचा हि प्रश्न सुटेल कारे ? नौकरीची शाश्वती , सुलभ आणि उपयुक्त शिक्षणाची हमी . कमी खर्चात लग्न होण्याची आणि अधून मधून म्हणजे महिन्यातून दोनदा सिनेमा पहायला अगदी खर्चाचे टेन्शन ना घेता मज्जेत जाता येईल कारे भावू ? आणि हो भाऊ.. सारखे सारखे पेट्रोल पंपावर जावे लागते ३५ रुपयाच्या पेट्रोल वर ३५ रुपये कर भरून पदरात घ्यावे लागते ते पेट्रोल विना कर मिळेल कारे भावू ? आणि ३० रुपयांची तुरडाळ पुन्हा कधी १००-२०० ने घ्यायची वेळ तर येणार नाही न भाऊ?

एक ना अनेक प्रश्न आहेत रे दादा तुझे ? एक जरा समजून घे … ‘स्मार्ट पुणे’ म्हणजे काय याचा शोध आपल्यासारख्याला लागायचाय  अजून .

दादा , साडेतीन हज्जार कोटी रुपये ५ वर्षात खर्च  करून पुण्याचा चेहरा मोहरा बदलून टाकायचा … हे शहर स्मार्ट करायचे असा निर्णय भाजपच्या सरकारने घेतला आहे अर्थात यासाठी केवळ ५०० कोटी केंद्राने तर राज्याने २५० कोटी निधी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे . आणि महापालिकेला २५० कोटी खर्च करा असे सांगितले आहे . आता प्रश्न आहे तो बाकीच्या २५०० कोटींचा ? ते कुठून आणणार ? तर साहजिक … यांच्या कंपन्या … उद्योजक तयार आहेत . हा पैसा लावायला … कारण पुणे स्मार्ट करायचे आहे ना ? आता हा पैसा त्यांनी लावला तर ते वसूल हि करणारच कि दादा … आपण अनेक रस्त्याची कामे खाजगी कंपन्यांकडून झालेली पाहतो आणि ते टोल गोळा करतानाही पाहतो … आता सध्या जे २५०० कोटी रुपये खाजगी उद्योजक लावणार आहेत असे म्हटले जाते साहजिकच हा आकडा वाढणार हि आहेच . आणि या पैशाची  वसुली अर्थातच याच कंपन्या करतील आणि ती आपल्याकडूनच बरे दादा, हे सूर्य प्रकाश इतके स्वच्छ आहे म्हणजे आताचे २५०० कोटी … संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यावर किती कोटीपर्यंत पोहोचणार ? आणि समजा होणारच असेल तर त्यातून पुणे किती स्मार्ट होणार ?काय काय नागरिकांपर्यंत पोहोचणार ? असे अनेक प्रश्न आहेतच आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पुणे अशा प्रकारे स्मार्ट झाल्यावर ..पुणेकरांना आपल्या खिशातून कुठे कुठे -कसा कसा टोल भरावा लागणार , मिळकत कर , पाणीपट्टी , भाऊ पे  फस्ट… नंतर पार्किंग … यात काय काय फरक होणार आहे याचा विचार नको का करायला ?

आता मुंबईत मेट्रो आणली .. तर तिचे भाडे ठरविण्यावरून ,  रस्त्यांवर टोल भरण्यावरून , नंतर त्यापोटी हप्ते खाणाऱ्यावरून भांडणे होतातच की… मुंबई केंद्राच्या अधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न मध्यंतरी झाला .केंद्रात जरी प्रचंड बहुमत असले तरी यापुढे होणाऱ्या विविध  निवडणुकात भाजपला बहुमत मिळविणे मुश्कील होत चालले आहे . आता पुढे कुठे कोणत्याही निवडणुका होवू देत ,,तिथे भाजपचे नाही सरकार आले तरी … होल्ट मात्र भाजपचाच राहायला हवा या साठी तर अशा ‘स्मार्ट’ स्वप्नांची  मखमली चादर ऐन थंडीत पांघरण्याचा  प्रयत्न तर होत नाही ना? अशी शंका का येवू नये आपल्याला . कारण ‘अच्छे दिन ‘ची वाट पहाता पहाता आता आपण स्मार्ट पुण्याचे स्वप्न पाहू लागलो आहोत .

दादा स्वप्नच ती  , झोपेतच पहावीत रे . .. जागेपणी स्वप्नांच्या मागे धावून,  स्वप्ने हाती लागतील काय ? त्या पेक्षा

आपण रमू या नक्कीच स्वप्नात .. राहू देखील स्वप्नांच्या जगात … पण आता दिवस उगविला आहे , सोड सारे आणि लक्ष दे आपल्या कामात …

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....