आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा हिवाळी शिबीराचा समारोप
‘स्मार्ट खेडी’निर्मितीची देखील गरज : लतीफ मगदूम
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातील ‘राष्ट्रीय सेवा योजने’च्या (एन एस एस) वतीने 7 दिवसीय रहिवासी हिवाळी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर कोरेगांव भिमा ता.शिरूर जि.पुणे येथे पार पडले. ‘स्वच्छ व स्वस्थ भारत अभिायान’ या संकल्पनेवर आधारित या हिवाळी शिबीरामध्ये एकूण 114 विद्यार्थीनींनी भाग घेतला होता.
‘स्वच्छ व स्वस्थ भारत अभिायान’ या संकल्पनेवर आधारित या हिवाळी शिबीरामध्ये गावामध्ये प्रभात फेरी, जैव वनस्पती सर्वेक्षण, ग्राम स्वच्छता जागृती, पाणी आडवा पाणी जिरवा, वनीकरण, सायबर क्राईम, श्रमदान, इतिहास लेखन, सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण, आपत्ती व्यवस्थापन, डेंग्यु आजाराबद्दल जागृती, सद्भावना रॅली, व्यक्तीमत्व विकास, मानसिक आरोग्य, गट चर्चा, पथ नाट्य आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
‘सध्या भारताच्या विभिन्न शहरांमध्ये ‘स्मार्ट सिटी’ची चर्चा आहे. त्या ऐवजी संपूर्ण भारतामध्ये ‘स्मार्ट व्हिलेज’ संकल्पना प्रामुख्याने राबविली गेलीे पाहिजे,कारण शहरामध्ये मानवी लोकसंख्येच्या दहापट वाहनांची प्रचंड संख्या वाढली आहे. शहरांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. मानवी जीवनाची वयोमर्यादा कमी होत चालली आहे. म्हणून युवा पिढीने शहरातून ग्रामीण व आदिवासी भागाकडे स्थलांतर करून त्या ठिकाणी शैक्षणिक सामाजिक माध्यमातून व्यक्तीमत्व विकास घडविला पाहिजे. त्यामुळे खेडयातील सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणातूनच ‘स्वच्छ व स्वस्थ भारत अभियान’ हा राष्ट्रीय सेवा याजनेचा उपक्रम यशस्वी होईल.’असे प्रतिपादन लतिफ मगदुम यांनी केले
या 7 दिवसीय शिबिराचा समारोप नुकताच लतीफ मगदूम (सचिव, एम.सी.ई.सोसायटी) यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते विद्यार्थीनींना मार्गदर्शन करताना बोलत होते.
समारोपाला प्रमूख पाहुणे म्हणून कोरोगांव भिमाचे उपसरपंच नितीन गव्हाणे व ‘अल अमीन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष नासीर शेख उपस्थित होते.
प्रास्ताविक आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्याल्याच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रकल्प समन्वयक प्रा. नुसरत शेख यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. शौकत खान तर आभार प्रदर्शन प्रा. मन्सुरा मुलानी यांनी केले. शिबीराचे संयोजन उपप्राचार्या डॉ.शैला बूटवाला आणि रा.से.यो. चे शिबीराचे समन्वयक डॉ.आफताब आलम व डॉ.इम्तियाझ झाहिद यांनी केले.
शिबीराचे उद्घाटन कोरेगांव भिमा ग्रामपंचायतचे सरपंच अनिता भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले होते. उद्घाटनाला प्रमूख पाहुणे म्हणून डॉ. निकी मल्होत्रा (प्राचार्या, कॉलेज ऑफ कॉम्प्यूर सायन्स, वाकड) उपस्थित होत्या.