सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अभिवादन
पुणे :
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. रविवारी सकाळी हिराबाग येथील पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शफी मामू शेख यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष खासदार अॅड. वंदना चव्हाण उपस्थित होत्या. औदुंबर खुने-पाटील आणि मुश्ताक पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी शंकर शिंदे, सुरेश पवार ,योगेश वराडे, अविनाश वेल्हाळ, श्याम ढावरे, संजय गाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.