‘प्यार का पंचनामा -२’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावर त्यांनी पुण्यातील सिनेमागृहांना भेट दिली आणि पत्रकारांशी ही संवाद साधला .
पुणेकर रसिकांची आमच्या सिनेमाला मिळालेली दाद पाहून खूप आनंद झाला आहे . माणसाच्या जीवनात वेळोवेळी येणारा सिनेमा हा स्वप्नरंजन घेवून येतो आणि आयुष्यातला बरचसं काळ माणूस स्वप्नरंजनात घालवितो ज्याने काहीसे का होईनात आयुष्य सुकर होते त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या सिनेमाला मानवी आयुष्यात स्थान आहे आमचा सिनेमा हा मेसेज वगैरे देण्याच्या फंदात नसावा त्याने निखळ करमणूक करावी आणि तणाव नाहीसा करणारच असावा अशी आमची नेहमीच अपेक्षा राहील असे यावेळी ओमकार कपूर याने सांगितले . त्याने जुदाई या सिनेमात अनिल कपूरच्या मुलाची भूमिका केली होती तर सिंघम , चेन्नई एक्स्प्रेस च्या अक्शन दिग्दर्शक जय सिंघ यांचा सनी हा मुलगा आहे . ‘कसोटी जिंदगी’कि सह अनेक मालिकांमधून त्याने भूमिका केल्या आहेत .