(पुणे-अनिल चौधरी)
सोलापूरच्या बोली भाषेवर आधारित विलक्षण प्रेमकथेचा हृदयस्पर्शी चित्रपट म्हणजे ‘रोल. नं. १८’, या चित्रपटातील नायक (संजय) हा शाळेतील विद्यार्थी व त्याचे ३ मित्र कानडी, तेलगु आणि मुस्लीम, अशा तीन भाषीकांची हि पटकथा असून संजय हा अतिशय गरीब कुटुंबातील विद्यर्थी असतो. वर्गातील विद्यार्थिनी पैकी दिपाली या श्रीमंत विद्यार्थिनीवर संजय एकतर्फी प्रेम करू लागतो. परंतु दिपालीला संजयच्या प्रेमाची कल्पना नसते. संजयच्या घराची परस्थिती हलकीची असते आणि तो प्रेमाच्या नादात नापास होतो. त्यांचे मित्र व प्रेयसी पास होऊन कॉलेजात पुढील शिक्षण घेतात. पण संजय त्या वेळेला आपला मार्ग बदलून दीपालीचा नाद सोडतो व आपल्या जीवनकर्माला लागतो.
कधी बिगारी तर कधी वेटर असे काम करीत शेवटी काम म्हणून तो रिक्षा चालक होतो. एका प्रसंगी कळत-नकळतपणे तिची संजयशी भेट होते. दिपाली परीक्षेला जात असताना तिची गाडी बंद पडते, योगा योगाने रिक्षा चालक म्हणून संजयच्या रिक्षात ती जाते, वाटेल जात असताना रस्त्यावर एका वयस्कर स्त्रीचा अपघात झालेला असतो तेव्हा संजय दिपालीला वाटेतच उतरवतो आणि त्या अपघात झालेल्या स्त्रीला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी बसवितो त्यामुळे दिपाली तेथून रागाने निघून जाते. ती जखणी स्त्री हि दुसरी कोणी नसून दीपालीची आई असते हे कल्यानंतर तिला मोठा दक्का बसतो. केवळ संजयच्या मदतीमुळे दीपालीच्या आईचे प्राण वाचले ह्या चागुलपणाचा तिच्यावर अतिशय प्रभाव पडतो आणि ती संजयच्या प्रेमात पडते. पण त्यांच्या या प्रेमाला दीपालीच्या घरच्यांचा विरोध असतो. तेव्हा हत्या केल्याची २० वर्षे शिक्षा भोगून एक व्यक्ती तुरुंगातून बाहेर पडतो, पण तो व्यक्ती कोण असतो, त्यानंतर संजय आणि दीपालीचे प्रेम प्रकरण पुढे काय वळण घेते ते प्रत्येक्षात पडद्यावर पहाव्यासाठी आपल्या चित्रपटगृहात लवकरच सदर करीत आहोत मराठी चित्रपट रोल नं. १८……….
” रोल नं 18 ” या चित्रपटाच्या टिमने सोलापूर येथे महाराष्ट्र पत्रकार संरक्षण समिती च्या पदाधिकारी यांची भेट घेतली व् चित्रपटा संदर्भात माहिती दिली.यावेळी पत्रकार समितीचे अध्यक्ष विनोद पत्रे, डॉ. अशोक मात्रे , विजय सूर्यवंशी , नंदकिशोर धोत्रे , अनिल चौधरी , तांडेल, मढ़वी , मदन पाटिल, यशवंत पवार यांनी रोल नं 18 च्या सर्व टीमला शुभेछ्या दिल्या.