‘ राजहंस ‘ गौरी गाडगीळच्या वाटचालीवरील पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन

Date:


पुणे-आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेली प्रख्यात जलतरणपटू; ‘ यलो ‘या गाजलेल्या,राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या
मराठी  चित्रपटाची नायिका,पुण्याच्या स. प . महाविद्यालयाची विद्यार्थिनी गौरी शेखर गाडगीळ … हिच्या वाटचालीबद्दल, ध्येयपूर्तीसाठी  घेतलेल्या परीश्रमाबाबत आणि गौरी बद्दल मान्यवरांचे लेख असलेल्या ‘राजहंस ‘ नावाच्या  पुस्तकाचे प्रकाशन सोमवार दिनांक २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पुण्याचे पालकमंत्री  गिरीश बापट यांच्या शुभहस्ते  नव्या पेठेतील पत्रकार भवन येथील  मुख्य सभागृहात होत  आहे . आंतरराष्ट्रीय स्तरावर जलतरणपटू म्हणून अनेक पारितोषिके मिळवलेल्या गौरीबद्दल राष्ट्रपतींपासून , बॉलीवूड मध्ये उत्कंठा निर्माण झाली . गौरीची कारकीर्द पाहून अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शक महेश लिमये यांनी ‘यलो ‘ सिनेमाची निर्मिती केल्यावर तर गौरी ची ख्याती आणखी सर्वदूर पोहोचली . बॉलीवूड मधून ‘यलो ‘ चा हिंदी रिमेक करण्याची देखील  घोषणा झाली . अनेक पुरस्काराने सन्मानित होवूनही गौरीने स प महाविद्यालयातील आपली वाटचाल अबाधितपणे सुरूच ठेवली आहे . या सर्व गोष्टी विचारात घेवून आता तिच्यावर ‘राजहंस ‘ हे पुस्तक येत आहे ज्याची लेखिका गौरीची आई सौ.स्नेहा गाडगीळ  स्वतः आहे . या पुस्तकाला हेमलकसा चे ज्येष्ठ समाजसुधारक डॉ.प्रकाश आमटे यांची प्रस्तावना लाभली आहे. या पुस्तकात अभिनेता रितेश देशमुख , उपेंद्र लिमये , अभिनेत्री मृणाल कुलकर्णी तसेच संध्या देवरुखकर , कमांडर राजेंद्र दीक्षित यांच्यासह अनेक मान्यवरांचे गौरी विषयीचे लिखाण आहे .
सामना चे सहायक संपादक अरुण निगवेकर तसेच अभिनेता उपेंद्र लिमये , दिग्दर्शक महेश लिमये हे देखील या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्यापारी एकतेचा उत्सव : व्यापार भूषणसह विविध मानाचे पुरस्कार जाहीर

व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन ; माजी...

ईदच्या सुट्टीतील बदलामुळे 28 मे रोजीच्या नियोजित पारपत्र मुलाखती आता 27 मे रोजी होणार

पुणे, 25 मे 2026 सरकारने जारी केलेल्या सुधारित सुट्टीसंदर्भातील अधिसूचनेनुसार,...

समाज जीवनातील वास्तव पुस्तक रूपात शब्दबद्द करण्याची गरज : फ.मु.शिंदे

राज्यस्तरीय दोन दिवसीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न  केडगाव,ता.२५...