रंगूनवाला फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने जागतिक संधिवात दिनानिमित्त मोफत ‘फिजिओथेरपी’ शिबिराचा 76 रूग्णांना लाभ
पुणे :
‘एम.ए.रंगूनवाला फिजिओथेरपी अॅण्ड रिसर्च महाविद्यालयामध्ये जागतिक संधिवात दिन साजरा करण्या आला. या दिना निमित्त मोफत फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये 76 रूग्णांनी लाभ घेतला. या शिबिरा अंतर्गत फिजिओथेरपिस्ट डॉक्टरांनी रूग्णांना मोफत सल्ला व व्यायामाबाबत मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये मान दुखी, पाठ दुखी, गुडघे दुखी, अर्धांगवायू आदी प्रकारच्या व्याधी असलेल्या रूग्णांना व्यायामाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
हे शिबिर ‘महाराष्ट्र मेडिकल आणि रिसर्च सेंटर’चे अध्यक्ष डॉ.एन.वाय.काझी आणि डॉ.अरीफ मेनन (सचिव) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. रोनिका अगरवाल (‘एम.ए.रंगूनवाला फिजिओथेरपी अॅण्ड रिसर्च महाविद्याल) यांनी शिबिराचे संंयोजन केले.
शिबिरामध्ये रूग्णांना मार्गदर्शन करताना डॉ.एन.वाय.काझी म्हणाले, ‘संधिवात ही एक सामाजिक समस्या आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात मधूमेह, उच्चरक्तदाब यांसारख्या विविध आरोग्य समस्या वाढल्या आहे. या बरोबरच लहान वयात संधिवात ही व्याधी देखिल वाढत आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये तासन्तास एकाच जागी बसून काम करणे, जंकफूडचे वाढते प्रमाण यामुळे लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. यालठ्ठपणामुळे सांध्याची झीज लवकर होते.यासाठी नियमित व्यायाम आणि आहाराचे योग्य प्रमाण याचा समतोेल आवश्यक आहे.’