युवा उद्योजक आणि समुपदेशक रिदम वाघोलीकर यांचा बँकॉकमध्ये सन्मान
पुणे :
पुण्यातील युवा उद्योजक आणि समुपदेशक रिदम सुधीर वाघोलीकर यांना नुकतेच ‘आसिआन थाई इंडियन बिझनेस लीडरशिप’ परिषदेत ‘युवा उद्योजक’ सन्मानाने बँकॉक येथे गौरविण्यात आले. हा सन्मान मिळविणारे ते भारतातील सर्वात तरुण उद्योजक ठरले आहेत.
रिदम वाघोलीकर हे पुण्यातील युवा ‘टॅरो कार्ड रिडर’ असून, त्यांना मागील वर्षी इस्मा इन्स्टिट्यूट (इंटरनॅशनल स्पिरिच्युअॅलिटी मार्केट) चे दोन पुरस्कार देखील मिळाले आहेत.
‘युवा उद्योजक’ सन्मान प्रदान कार्यक्रम थायलंडमधील बँकॉक येथे झाला. यावेळी थायलंडमधील शाही घराण्यातील सदस्य, स्थानिक उद्योजक आणि सरकारी प्रतिनिधी उपस्थित होते.