पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबागच्या संगीत सभेत सुप्रसिध्द गायक शंकर महादेवन याने ‘बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात, भेट आपली स्मरशी काय तु मनात’ सादर करीत उपस्थित विद्यार्थ्यांना संगीतातील बारकावे समजावून सांगितले.
महादेवन म्हणाले, ‘ज्या प्रमाणे व्याकरणाचे भाषेमध्ये महत्व आहे, त्या प्रमाणे संगीतात शास्त्रीय संगीताचे महत्व आहे. शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाने गाण्याचा पाया भक्कम होतो. शास्त्रीय संगीतामुळे कुठल्याही प्रकारचे गाणे तुम्हाला सहजतेने गाता येते.’
रमणबागेतील संगीत सभेत दर रविवारी दोन तास शास्त्रीय संगीत शिकविले जाते. हा उपक‘म आतिशय स्तुत्य आहे. विद्यार्थ्यांनी केवळ लोकप्रियतेच्या मागे न धावता, या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शास्त्रीय संगीताचा सखोल सराव करणे आवश्यक आहे. असे मतही श्री. महादेवन यांनी व्यक्त केले.
मु‘याध्यापक प्रल्हाद शिंदे यांनी स्वागत केले. संगीत शिक्षक अजय पराड यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. पंडित जीतेंद्र अभिषेकी यांचे शिष्य पं. महेश काळे, उपमु‘याध्यापिका चारुशिला वंजारी, पर्यवेक्षक सुनील शिवले यांची प्रमुख उपस्थिती होती.